PUNE

पुणे : बांधकाम व्यावसायिकाची चार कोटींची फसवणूक प्रकरणात फरार झालेली तरुणी गजाआड

पुणे : शहरातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयातील रोखपालाकडे बतावणी करुन चार कोटी सहा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तरुणीला सायबर पोलिसांनी बिहारमधून अटक केली. तरुणीने बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात दूरध्वनी करुन बांधकाम व्यावसायिक कंपनीतील कर्मचारी असल्याची बतावणी केली होती. तातडीने चार कोटी रुपयांची रक्कम बँक खात्यात जमा करण्यास सांगून फसवणूक केली होती. सानिया ऊर्फ गुड्डीया माेहम्मद मुस्तकीम साहब सिद्दीकी (वय २१, मूळ रा. बिहार) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. सानियाला फेब्रुवारी महिन्यात बांधकाम व्यावयायिकाची फसवणूक प्रकरणी सायबर पाेलिसांनी फरिदाबाद परिसरातून अटक केली होती. तिला रेल्वेतून घेऊन पोलिसांचे पथक पुण्याकडे निघाले होते. पोलिसांची नजर चुकवून राजस्थानातील काेटा रेल्वे स्थानकातून ती पसार झाली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. ती बिहारमधील गाेपालगंज जिल्ह्यातील एका गावात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे सापळा लावला. हेही वाचा – समाविष्ट गावातीत पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेचे मोठे पाऊल ! u पोलिसांचे पथक वेशांतर करुन तेथे गेले होते. तेथील शेतात पोलिसांचे पथक थांबले होते. रात्रभर पोलिसांचे पथक तेथे होते. पोलिसांनी शेतातील घरातून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती घराच्या छतावरुन उडी मारुन पसार होण्याच्या प्रयत्नात होती. पोलिसांनी तिला पाठलाग करुन पकडले, अशी माहिती सायबर पोलीस ठाण्यातील पाेलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी दिली. सानियाला पकडण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी दिले होते. हेही वाचा – महापालिकेची कामगिरी १८ दिवसात केल्या २७ मिळकती सील! तांत्रिक तपास करुन पोलिसांनी तिचा माग काढला. पाेलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, उपनिरीक्षक संदीप कदम, पोलीस कर्मचारी सिमा सुडीत, संदीप पवार यांचे पथक दिल्ली येथे गेले. स्थानिक पाेलिसांच्या मदतीने जामियानगर भागात तिचा शाेध घेण्यात आला. सानिया बिहारमध्ये असल्याची माहिती पाेलिस कर्मचारी अश्विन कुमकर यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिला ताब्यात घेतले. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.