मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने गर्दीचे नियोजन करण्यासाठी काही रेल्वेगाड्यांच्या संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या संरचनेनमुळे डबे वाढवण्यात आले असून प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होईल. हे बदल तात्पुरत्या कालावधीसाठी असतील. लग्न समारंभानिमित्त, नाताळ सण आणि बाहेरगावी फिरायला जाण्यासाठी बहुसंख्य नागरिक रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. त्यामुळे नियमित प्रवाशांसह वाढीव गर्दी होते. ही गर्दी विभाजित करण्यासाठी रेल्वेगाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत सुधारणा केली आहे. हेही वाचा – मुंबईच्या किमान तापमानात घट हेही वाचा – हृदय शस्त्रक्रियेद्वारे तीन जणांना जीवदान! पश्चिम भारतातील दुर्मिळ शस्त्रक्रिया… गाडी क्रमांक २२७३१ हैदराबाद ते सीएसएमटी एक्स्प्रेसला १५ डिसेंबरपर्यंत आणि गाडी क्रमांक २२७३२ सीएसएमटी-हैदराबाद एक्स्प्रेसला १८ डिसेंबरपर्यंत सुधारित संचनेनुसार धावेल. या रेल्वेगाडीला सुधारित संरचनेनुसार तीन वातानुकूलित द्वितीय डबे, सात वातानुकूलित तृतीय डबे, दोन शयनयान, दोन सेकंद सीटिंग, एक सेकंड सीटिंग कम ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार अशी १६ डब्यांची रेल्वेगाडी असतील. गाडी क्रमांक १२७०१ सीएसएमटी ते हुसेन सागर एक्स्प्रेसला १६ डिसेंबरपर्यंत आणि गाडी क्रमांक १२७०२ हुसेन सागर-सीएसएमटी एक्स्प्रेसला १७ डिसेंबरपर्यंत सुधारित संरचनेनुसार धावेल. या रेल्वेगाडीला सुधारित संरचनेनुसार तीन वातानुकूलित द्वितीय डबे, सात वातानुकूलित तृतीय डबे, दोन शयनयान, दोन सेकंद सीटिंग, एक सेकंड सीटिंग कम ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार अशी १६ डब्यांची रेल्वेगाडी असतील. None
Popular Tags:
Share This Post:
प्राण्यांच्या दहनवाहिनीच्या खर्चात बचत, गॅसची देयके १ लाखावरून ४० हजारांवर; दिवसातून दोनवेळा दहनविधी
December 24, 2024What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 20, 2024
-
- December 20, 2024
-
- December 20, 2024
Featured News
Latest From This Week
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.