मुंबई : दहिसरमध्ये मुंबई महापालिकेचा राडारोडा (डेब्रीज) पुनप्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झाला असून या ठिकाणी मुंबईतील घरगुती स्तरावरील बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्यावर शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्प्रक्रिया करण्यात येत आहे. दहिसरच्या कोकणीपाडा येथे पाच एकर जागेवर उभारलेल्या या प्रकल्पाची प्रतिदिन प्रक्रिया क्षमता ६०० टन इतकी आहे. वांद्रे ते दहिसर या पश्चिम उपनगरांत निर्माण होणाऱ्या राडारोड्यावर या प्रकल्पात पुनर्प्रक्रिया केली जात आहे. आतापर्यंत या प्रकल्पात १६ हजार मेट्रिक टन राडारोड्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे कचऱ्यातील राडारोड्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा आतापर्यंत नव्हती. त्यामुळे रात्रीच्या वेळी राडारोडा रस्तावर, कचऱ्यात टाकणे असे प्रकार घडत होते. तसेच अनेकदा राडारोडा टाकून कांदळवनात भरणीही करण्यात येत होती. या सगळ्याला आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने राडारोडा विल्हेवाटीसाठी दोन ठिकाणी प्रकल्प सुरू केले आहेत. शहर भागातील आणि पूर्व उपनगरातील राडारोड्यासाठी कल्याण शिळफाटा येथील डायघर गावात एक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. तर पश्चिम उपनगरातील राडारोड्याच्या विल्हेवाटीसाठी दहिसरच्या कोकणीपाडा येथे प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत प्राथमिक चाचणीसाठी १४ ऑगस्ट २०२४ पासून राडारोडा संकलन सुरू करण्यात आले होते. तर ४ नोव्हेंबर २०२४ पासून प्रत्यक्ष प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. हेही वाचा : वास्तुरचनाकार – नियोजनकार शिरीष पटेल यांचे निधन दहिसर येथील प्रकल्पात १८ डिसेंबर २०२४ पर्यंत १७ हजार ६०० मेट्रिक टन राडारोडा संकलन करण्यात आला. त्यापैकी १६ हजार मेट्रिक टन राडारोड्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यात आली आहे. राडारोडा बारीक करून त्यातून निर्माण होणारे वाळूसदृश्य घटक पेवर ब्लॉक, दुभाजक, पदपथांसाठी लागणारे दगड, बाक (बेंच) यांच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणार आहेत. घराघरातून निर्माण होणाऱ्या राडारोच्या संकलनासाठी मुंबई महानगरपालिकेने ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवा अद्ययावत केली आहे. या सेवेची मागणी नोंदवण्यासाठी महानगरपालिकेने १८००-२१०-९९७६ हा टोल फ्री क्रमांक जाहीर केल्यापासून गेल्या आठ दिवसांत २२० जणांनी दूरध्वनी केले आहेत. त्याद्वारे ५४ मेट्रिक टन राडारोडा संकलित करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. हेही वाचा : सिफिलीस बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने २०१६ मध्ये बांधकाम कचऱ्याचे नियमन करण्यासाठी ‘बांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापन नियम’ अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार, मुंबई महानगरपालिकेने बांधकामाचा कचरा तसेच राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी बांधकाम आणि पाडकाम कचरा (कन्स्ट्रक्शन ॲण्ड डिमोलिशन वेस्ट) शास्त्रोक्त प्रक्रिया प्रकल्प सुरू केला. राडारोडा संकलन, वाहतूक, त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणे, त्यासाठी जागा मिळवून प्रकल्प उभारणे, मनुष्यबळ व संयंत्रे इत्यादी यंत्रणा उभी करणे, या सर्व बाबींची जबाबदारी कंत्राटदारावरच सोपविण्यात आली आहे. पुढील २० वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटदार नियुक्त केले आहेत. पश्चिम उपनगरांसाठी (वांद्रे ते दहिसर) मेसर्स एजी एनव्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा प्रकल्प दहिसर, कोकणीपाडा येथे पाच एकर जागेवर आहे. या प्रकल्पात राडारोड्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यापासून वाळू, रेती, खडक, माती तयार केली जाते. याचा वापर रस्ते बांधकाम, लहान स्वरुपाचे बांधकाम, पेव्हर ब्लॉक तयार करणे याकरीता करण्यात येणार आहे. हेही वाचा : मुंबई : बलात्कार प्रकरणातील आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक घरातला राडारोडा देण्यासाठी महानगरपालिकेकडे मागणी प्राप्त झाल्यानंतर संबंधित कनिष्ठ पर्यवेक्षक प्रत्यक्ष ठिकाणी भेट देवून पाहणी करून खातरजमा करतात. राडारोडा वाहून नेण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीचा अंदाज घेतात. त्यांच्याकडून मागणी मंजूर झाल्यानंतर संबंधित नागरिकांस मोबाइल ॲपवर, व्हॉटस् ॲपवर कळवले जाते. निर्धारित शुल्क भरणा केल्यानंतर ४८ तासांच्या आत राडारोडा संकलन करून वाहून नेण्यात येतो. मुंबईकरांनी या ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवेला अधिकाधिक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (प्रभारी) किरण दिघावकर यांनी केले. None
Popular Tags:
Share This Post:
प्राण्यांच्या दहनवाहिनीच्या खर्चात बचत, गॅसची देयके १ लाखावरून ४० हजारांवर; दिवसातून दोनवेळा दहनविधी
December 24, 2024What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 20, 2024
-
- December 20, 2024
-
- December 20, 2024
Featured News
Latest From This Week
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.