NASHIK

छगन भुजबळ यांना डावलल्याने समर्थक संतप्त, अजित पवारांविरोधात घोषणाबाजी, रास्ता रोको, टायर जाळले

नाशिक : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीने (अजित पवार) ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांना डावलल्याने भुजबळ समर्थकांनी नाशिक येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध केला. राष्ट्रवादीच्या मुंबई नाका लगतच्या कार्यालयाबाहेर रात्री समर्थकांनी टायर पेटवले तर, सोमवारी येवला मतदारसंघात रास्ता रोको करण्यात आला. नव्या मंत्रिमंडळात भुजबळ यांना वगळल्याने खुद्द भुजबळ यांच्यासह समर्थकांना धक्का बसला. मंत्रिमंडळात भुजबळ यांचा सहभाग गृहीत धरून समर्थकांनी जय्यत तयारी केली होती. इतकेच नव्हे तर, गतवेळी महायुती सरकारमध्ये उशिराने सहभागी झालेल्या अजित पवार गटाला प्रयत्न करूनही नाशिकचे पालकमंत्रिपद अखेरपर्यंत मिळाले नव्हते. त्यामुळे यंदा सरकार स्थापन होण्यापूर्वीच भुजबळ समर्थकांनी मोर्चेबांधणी केली होती. ज्येष्ठ नेते भुजबळ यांनी नाशिकचे पालकमंत्री व्हावे म्हणून युवक राष्ट्रवादीच्यावतीने महादेवाला दुग्धाभिषेक करून साकडे घालण्यात आले होते. नव्या मंत्रिमंडळात भुजबळ यांचा समावेश नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्व चित्र पालटले. संतप्त समर्थकांनी रात्री मुंबई नाका परिसरातील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयासमोर टायर पेटवून अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केल्याच्या चित्रफिती समाजमाध्यमात पसरल्या. सोमवारी सकाळीही समर्थक या परिसरात आंदोलनासाठी जमले. हेही वाचा… छगन भुजबळ यांचे मंत्रिपद जाण्यामागे अनेक कारणे ब भुजबळांच्या येवला विधानसभा मतदारसंघात आ्ंदोलनाचे सत्र सुरू आहे. सोमवारी विंचूर येथे रास्ता रोको करुन कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाच्या कार्यपद्धतीचा निषेध केला. येवला येथील भुजबळ यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.