NASHIK

नाशिक शहरात १५ लाखांपासून पाच कोटींपर्यंत घरे, आजपासून शेल्टर २०२४ गृह प्रदर्शन

नाशिक – क्रेडाई नाशिक मेट्रोच्यावतीने २० ते २५ डिसेंबर या कालावधीत आयोजित शेल्टर – २०२४ या गृह प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून शुक्रवारी त्याचे उद्घाटन होणार आहे. प्रदर्शनात अगदी १५ लाखापासून पाच कोटी रुपयांपर्यंतची घरे, दुकाने, भूखंड, शेतघर, कार्यालय, गोदाम, शेतजमीन, औद्योगिक भूखंड आदींचे असंख्य पर्याय, तसेच इंटेरिअर, बांधकाम साहित्य, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, सुरक्षा साहित्य, गृहकर्ज असे अनेक कक्ष एकाच छताखाली उपलब्ध असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली. हेही वाचा – उपाय न योजल्यास कांदा अधिक घसरण्याची भीती, लासलगाव समितीचे केंद्रीय अर्थमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांना साकडे प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार आदींच्या उपस्थितीत होणार आहे. प्रदर्शनात १०० हून अधिक विकसकांचे ५०० हून अधिक पर्याय उपलब्ध आहेत. हेही वाचा – अबब…सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये १९ कोटींचा घोडा मागील काही वर्षात रस्ते, हवाई तसेच रेल्वेद्वारे नाशिकची देशभरात संपर्क व्यवस्था वाढली. समृद्धी महामार्ग, प्रस्तावित चेन्नई – सुरत महामार्ग आणि नाशिक-पुणे रेल्वे, यामुळे आगामी काळात नाशिकचे महत्व आणखी वाढणार आहे. नाशिकमध्ये स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले. पाच दिवसीय प्रदर्शनात विविध विषयांवर परिसंवाद होणार असल्याचे दीपक बागड यांनी सांगितले. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.