PUNE

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांची ८५ कोटींची मालमत्ता जप्त

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांची ८५ कोटी रुपयांची मालमत्ता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली. बांदल यांची पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली. बेकायदा आर्थिक व्यवहार (मनी लॉड्रिंग) प्रकरणी मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडीतील निवासस्थानी ईडीने २१ ऑगस्ट रोजी छापे टाकले होते. हेही वाचा >>> Chakan Suicide : प्रेमप्रकरणातून चाकणमधील तरुणाची आत्महत्या; दोन सेकंदांचा व्हिडीओ अन् बचाव पथकाने ३७० फूट खोल दरीत मृतदेह शोधला ईडीकडून बांदल यांच्या निवासस्थानातून कागदपत्रे जप्त केली. बांदल यांच्या बँक खात्यांची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. त्यानंतर बांदल यांना ईडीकडून अटक करण्यात आली. बांदल यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. बांदल यांच्याविरुद्ध शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. बांदल यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली होती. मात्र, बांदल यांची गु्न्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन त्यांची उमदेवारी रद्द करण्यात आली होती. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.