उल्हासनगर : ‘आज जो गद्दारी करतो तू मुख्यमंत्री बनतो, राजकारणाची आजची व्याख्या बदलली आहे’ असे गंभीर वक्तव्य उल्हासनगरच्या भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात केले. या वक्तव्यावरून उल्हासनगरात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला असून भाजप उमेदवाराचे काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार कुमार आयलानी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रविवारी महायुतीच्या मेळाव्यापूर्वीच शिवसैनिकांनी प्रदीप रामचंदानी यांना जाब विचारल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. शिवसैनिकांनी मेळाव्यावर बहिष्कार टाकला. जोपर्यंत भाजपचे वरिष्ठ याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत आम्ही प्रचार करणार नाही, अशी भूमिका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. एकीकडे महायुती इच्छुकांनी बंडोबांना थंड करण्यामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या नाकी नऊ आले असताना उल्हासनगरात मात्र भाजपच्या एका बोलघेवड्या पदाधिकाऱ्याने वादग्रस्त वक्तव्य करत महायुतीत तणाव वाढवला आहे. शनिवारी उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ साई पक्षाने भाजपसोबत आपली आघाडी जाहीर केली. यावेळी बोलताना भाजपचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त व्यक्त केले. ‘राजकारणात जो गद्दारी करतो तो मुख्यमंत्री होतो, अशी राजकारणाची व्याख्या सध्या बदलली आहे, असे वक्तव्य रामचंदानी यांनी केले. यावेळी जीवन इदनानी आपल्या विरुद्ध होते. मात्र ते आज आपल्या सोबत आहेत असेही रामचंदानी यावेळी म्हणाले. हेही वाचा… बंडोबा थंडावताच संजय केळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचा केळकरांचा दावा मात्र रामचंदानी यांच्या वक्तव्यानंतर उल्हासनगर शहरातील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. प्रदीप रामचंदानी यांनी आपल्या वक्तव्याची जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिवसैनिकांकडून केली जाते आहे. भाजपचे आमदार कुमार आयलानी यांच्या प्रचारासाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय राहावा यासाठी रविवारी मेजर अरुण कुमार वैद्य सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला शिवसैनिक सभागृहाबाहेर हजर झाले. यावेळी काही शिवसैनिकांनी तिथे उपस्थित रामचंदानी यांना आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल जाब विचारण्यास सुरुवात केली. काही मिनिटात रामचंदानी सभागृहात निघून गेले. त्यानंतर आमदार कुमार आयलानी तसेच भाजपचे इतर पदाधिकारी शिवसेना पदाधिकाऱ्यांना सभागृहात येण्याची विनंती करत होते. मात्र भाजपने आपली भूमिका जाहीर करावी, मगच आम्ही आत येऊ असे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाणही उपस्थित होते. शिवसेनेचे पदाधिकारी अरुण आशान यांनी यावेळी बोलताना भाजपने आपल्या बैठकीत त्यांची भूमिका स्पष्ट करावी. अशा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना प्रचारापासून दूर ठेवावे. तरच आम्ही महायुतीचा प्रचार करू अशी भूमिका माध्यमांसमोर मांडली. त्यामुळे उल्हासनगर महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. हेही वाचा… फुटीर आमदारांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांची आक्रमक रणनीती, भिवंडी ग्रामीणमध्ये जिल्ह्यातील पहिली सभा उल्हासनगरतील भाजपचे वादग्रस्त नगरसेवक म्हणून प्रदीप रामचंदानी ओळखले जातात. पालिकेतून फाईल लपवून नेणे. वादग्रस्त वक्तव्य करणे असे प्रकार यापूर्वी रामचंदानी यांनी केली होते. अशाच वादग्रस्त वक्तव्यांमुळे काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर पालिके बाहेर हल्लाही झाला होता. None
Popular Tags:
Share This Post:
मराठी भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे, अखिलेश शुक्ला यांचा आरोप
- by Sarkai Info
- December 20, 2024
What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 20, 2024
-
- December 20, 2024
-
- December 20, 2024
डोंबिवलीत कस्तुरी प्लाझाजवळील वाहनांचे सुट्टे भाग गोदामाला आग
- By Sarkai Info
- December 19, 2024
Featured News
Latest From This Week
कल्याण तहसीलदार कार्यालयातील महसूल साहाय्यक शेतकऱ्याकडून लाच घेताना अटक
THANE
- by Sarkai Info
- December 19, 2024
कल्याणमध्ये पालिकेच्या खासगी स्वच्छता कामगारांकडून रेल्वे प्रवाशांची लूट
THANE
- by Sarkai Info
- December 19, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.