THANE

तलावांच्या ठाण्यात चारच पाणथळांचे सर्वेक्षण, ठाणे शहरातील चार ठिकाणांची पाणथळ क्षेत्रात नोंद

ठाणे : तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहरात ३५ तलावांबरोबरच ३२ किलोमीटरचा खाडीकिनारा परिसर येत असतानाही, राज्य शासनाच्यावतीने नुकत्याच केलेल्या पाहाणीत ठाणे शहरातील चार जागांचे सर्वेक्षण करण्यात आल्याचे उघड होत आहे. यामध्ये घोडबंदर, रायलादेवी तलाव, उपवन तलाव आणि आंबेघोसाळे तलाव या चार जागांचा समावेश आहे. तलावांचे शहर म्हणून ठाणे शहराल ओळखले जाते. एकेकाली शहरात ७५ हून अधिक तलाव होते. परंतु अतिक्रमणामुळे अनेक तलाव नामशेष पावले. शहरात सद्यस्थितीत ३५ तलाव आहेत. या तलावांचे अस्तित्व टिकविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तलावांचा परिसर सुशोभित करण्याबरोबरच पाणी शुद्धीकरणांसाठी यंत्रे बसविण्यात येत आहेत. गणेश मुर्ती विसर्जनामुळे तलाव प्रदुषित होऊ नयेत यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येत आहेत. याशिवाय, ठाणे शहराला ३२ किलोमीटरचा खाडीकिनारा परिसर लाभला आहे. घोडबंदरपासून ते कोपरी आणि कळवा परिसरातून ही खाडी जाते. या खाडी परिसरातील कांदळवनावर भराव टाकून अतिक्रमण होत असून ते रोखण्यासाठी पालिकेकडून खाडी सुशोभिकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. असे असतानाच, राज्याच्या पर्यावरण विभागाकडे ठाणे शहरातील घोडबंदर, रायलादेवी तलाव, उपवन तलाव आणि आंबेघोसाळे तलाव या चार ठिकाणांची पाणथळ क्षेत्रामध्ये नोंद असल्याची बाब माहिती अधिकारातून पुढे आली आहे. हेही वाचा – ठाण्यात पाचशे घरांचा गॅस पुरवठा तीन तासंपासून ठप्प, जलवाहिनीच्या खोडकामादरम्यान गॅस वहिनी तुटली नवी मुंबईतील राहणारे बी.एन. कुमार यांनी राज्याच्या पर्यावरण विभागाकडे राज्यातील पाणथळ क्षेत्रांची माहिती मागितली होती. ही माहिती पर्यावरण विभागाने त्यांना नुकतीच दिली आहे. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यात १९ तर, ठाणे शहरात ४ ठिकाणेच पाणथळ क्षेत्र असल्याची नोंद आहे. चेन्नईच्या राष्ट्रीय शास्वत किनारपट्टी व्यवस्थापन संस्थेने राज्यभरात केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे ही ठिकाणे निश्चित करण्यात आल्याचे पर्यावरण विभागाने कुमार यांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे. पाणथळ क्षेत्राच्या निकषात बसत असलेली पाणथळ क्षेत्र निश्चित करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी पाणथळ अभ्यास समिती नेमली होती. या समितीने जिल्ह्यात १३२ ठिकाणे पाणथळ असल्याची नोंद केली होती. परंतु, मुंबई उच्च न्यायालयात तहसीलदारांनी सादर केलेल्या माहितीत ४ ते ५ क्षेत्रांची नोंद होती. त्यामुळे इतर क्षेत्रांचा पाणथळ क्षेत्रात समावेश झाला नाहीतर, ही क्षेत्र अतिक्रमणामुळे नष्ट होतील आणि तेथील जैवविविधताही नष्ट होईल. – रोहीत जोशी, पर्यावरण प्रेमी हेही वाचा – पावणे सहा कोटीचे दागिने घेऊन चोरटे परराज्यात? शहरातील पाणथळ क्षेत्र सुचीत करण्यासाठी जिल्ह्याची समिती यादी तयार करते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षखेखाली ही समिती कार्यरत असते. स्थानिक स्वराज्य संस्था आवश्यक ती माहिती देत असते. पाणथळ क्षेत्राचे नियम लक्षात घेऊन समिती यादी तयार करते. ही समिती शासनाकडे यादी पाठविते. त्याला शासन मान्यता देते. – मनिषा प्रधान, मुख्य प्रदूषण नियंत्रण अधिकारी, ठाणे महापालिका None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.