THANE

Video: “तो अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला…”, कल्याण मारहाण प्रकरणी अजित पवारांनी विधानसभेत मांडली भूमिका!

Kalyan Society Crime News: कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीत एका मराठी माणसाला झालेल्या मारहाणीचा मुद्दा थेट विधिमंडळ अधिवेशनापर्यंत जाऊन पोहोचला. विधानसभेत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी हा मुद्दा मांडल्यानंतर त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परखड शब्दांत भूमिका मांडत कारवाईचं आश्वासन दिलं. गुरुवारी संध्याकाळी कल्याणमध्ये घडलेल्या या प्रकारावर तीव्र पडसाद उमटत असून मराठी व्यक्तीला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्ला यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. कल्याणमधील या प्रकाराचा उल्लेख सुनील प्रभूंनी विधानसभेत केला. “माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. कल्याणमध्ये योगीधाम नावाचा परिसर आहे. तिथल्या सोसायटीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाटचे अकाऊंटंट मॅनेजर अखिलेश शुक्ला राहतात. तिथेच विजय कळवीट्टेकर नावाचे मराठी गृहस्थ राहतात. शुक्ला यांच्या पत्नी रोज धूप लावतात यावरून त्या दोघांचं भांडण झालं. हे भांडण एवढं विकोपाला गेलं की त्यांनी अभिजित देशमुख यांना मारहाण केली”, असं सुनील प्रभू म्हणाले. Kalyan Crime: कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक फोन आला तर..”, रहिवाश्यांचा संताप, वैयक्तिक वाद विकोपाला! “अखिलेश शुक्ला यावेळी म्हणाले की तुम्ही काय जाता पोलीस स्थानकाला? मुख्यमंत्री कार्यालयातून एक फोन येईल आणि तुम्हाला परत यावं लागेल. ते असंही म्हणाले की ‘तुम मराठी गंदे लोग, तुम मच्छी-मटण खाते हो, तुम मराठी नीच हो, तुम्हारी बिल्डिंग में रेहेनेकी औकात नहीं है’. मराठी माणसावर हा अन्याय आहे. ते शुक्ला असंही म्हणतात की मी मंत्रालयात कामाला आहे. तुझ्यासारखी ५६ मराठी माणसं माझ्यासमोर झाडू मारतात. कोण आहे हा शुक्ला? लाल दिव्याची गाडी वापरतात. मराठी माणसाची गळचेपी महाराष्ट्रात होत आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल, पोलीस स्टेशनमध्ये तुमची केस घेतली जाणार नाही एवढी त्यांची दादागिरी आहे. त्यानं बाहेरून लोक आणून मराठी माणसाला मारहाण केली. तो माणूस आज रुग्णालयात गंभीर आहे. महाराष्ट्रातला मराठी माणूस ही परिस्थिती सहन करणार नाही”, अशा शब्दांत सुनील प्रभू यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, या मुद्द्यावर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सविस्तर भूमिका मांडली. “सुनील प्रभूंनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. हा महाराष्ट्र शिव-शाहू-फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही. आत्ता जी माहिती दिली, ती ताबडतोब तपासून तो अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला, तरी त्याची हयगय केली जाणार नाही. त्याच्यावर कारवाई केली जाईल. या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान-सन्मान राज्यात ठेवला जाईल, अशाच पद्धतीने प्रशासन वागेल याची खात्री मी सभागृहाला देतो. त्यावर तत्परतेनं कारवाई करण्याचे आदेशही दिले जातील”, असं आश्वासन अजित पवारांनी विधानसभेत दिलं. Kalyan Society News: “कल्याणमध्ये मराठी माणसावर हल्ला, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे”, ठाकरे गटाची मागणी! योगीधाम परिसरातल्या अजमेरा सोसायटीमध्ये हा सगळा प्रकार घडला. अखिलेश शुक्ला व विजय कळवीकट्टे हे सख्खे शेजारी. पण त्यांच्यात एका किरकोळ कारणावरून मोठा वाद झाला. शुक्ला यांच्या पत्नी घराबाहेर लावत असलेल्या धूपच्या धुरामुळे कळवीकट्टे कुटुंबातील लहान मूल व वृद्ध व्यक्तीला त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्याकडून वारंवार यासंदर्भात शुक्ला यांना सांगितलं जात होतं. मात्र, यावरून त्यांच्यात मोठा वाद निर्माण झाला. शिवीगाळ, मारहाणीपर्यंत प्रकरण गेलं. त्याच मजल्यावर राहणारे अभिजीत देशमुख व धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा राग धरून शुक्ला यांनी अभिजीत देशमुख यांनाच मारहाण केली. या प्रकरणात देशमुख व शुक्ला या दोघांच्या तक्रारींवरून गुन्हा दाखल केल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.