THANE

Raj Thackeray : “शिवसेना उबाठाच्या होर्डिंगवर जनाब बाळासाहेब ठाकरे…”, राज ठाकरेंचा संताप; एकनाथ शिंदेंनाही सुनावलं

Raj Thackeray angry on Uddhav Thackeray over MVA Hoardings : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (४ नोव्हेंबर) कल्याणमधील प्रचारसभेद्वारे शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच शिवसेनेच्या, महाविकास आघाडीच्या होर्डिंग्सवर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाआधी हिंदूहृदयसम्राट ही उपाधी न लिहिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. राज ठाकरे म्हणाले, “शिवसेनेच्या (ठाकरे) होर्डिंग्सवर एक लाजिरवाणी गोष्ट पाहिली. उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेल्यामुळे त्यांच्या होर्डिंग्सवरून बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढे लिहिली जाणारी ‘हिंदूहृदयसम्राट’ ही उपाधी हटवण्यात आली आहे. त्यांचा हिंदूहृदयसम्राट असा उल्लेख करायला कोणीही तयार होईना”. राज ठाकरे म्हणाले, “त्यांच्या होर्डिंग्सवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असायचा. मात्र, त्यांच्या नावापुढे कुठेही हिंदूहृदयसम्राट लिहिलं नाही. मी काही ठिकाणी उर्दू होर्डिंग्स बघितले. त्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाअगोदर जनाब असा उल्लेख केला होता. जनाब बाळासाहेब ठाकरे असं लिहिलं होतं. उद्धव ठाकरे स्वतःच्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी इतक्या खालच्या स्तरावर गेले आहेत”. हे ही वाचा >> सुरतमध्ये महाराजांचं मंदिर, मुलांना मोफत शिक्षण अन् जीवनावश्यक वस्तूंचे स्थिर दर; राधानगरीच्या सभेत ठाकरेंनी कोणती वचने दिली? मनसे अध्यक्ष म्हणाले, “मी अलीकडेच विधानसभेत गेलो होतो. तिथे बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या चित्राचं अनावरण केलं जाणार होतं. विधानसभेत सर्व आमदार बसले होते. त्या आमदारांकडे पाहून मला समजत नव्हतं की कोण कुठल्या पक्षाचा आमदार आहे. मी तेव्हा सभापतींना विनंती केली की बाळासाहेब ठाकरेंची दोन तैलचित्रे इथे असायला हवीत. एक विधानसभेच्या गॅलरीत, तर दुसरं विधान परिषदेत, जेणेकरून इथे येणाऱ्या आमदारांना जाणीव असली पाहिजे की आपण तिथे कोणामुळे आलो आहोत”. हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 Live : उद्धव ठाकरेंना धक्का, ज्याच्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपवली त्याचाच शिंदे गटात प्रवेश राज ठाकरे म्हणाले, “उद्धव ठाकरे सरकारची अडीच वर्षे कशीबशी संपली. त्याच काळात खालच्या खाली ४० आमदार निघून गेले. कुठे गेले तर निसर्ग पाहायला गेले. ४० आमदार निघून गेले आणि मुख्यमंत्र्यांना त्याचा पत्ता देखील नाही. मुख्यमंत्र्यांबरोबर इंटेलिजन्स विभागाचे अधिकारी असतात. हे अधिकारी मुख्यमंत्र्यांना प्रत्येक बारीकसारीक गोष्टीची माहिती देत असतात. परंतु मुख्यमंत्र्यांना या सगळ्याचा थांगपत्ता नाही. खालच्या खाली चाळीस जण निघून गेले आणि यांना कळलंसुद्धा नाही. तसेच शिवसेना सोडून जाणारे एकनाथ शिंदे त्यावेळी म्हणाले होते की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकारमध्ये काम करता येणार नाही. अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसून श्वाससुद्धा घेता येत नाही. असं म्हणून शिंदे भाजपा बरोबर जाऊन सरकारमध्ये बसले. काही दिवसांनी अचानक अजित पवार हे शिंदेच्या मांडीवर येऊन बसले. आता त्यांना काहीच करता येईना. राज्यात हे कुठल्या प्रकारचं राजकारण चालू आहे ते कळायला मार्ग नाही”. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.