THANE

ठाण्यात दिवाळी काळात हवा आणि ध्वनी प्रदुषणात वाढ, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत प्रदुषणात घट झाल्याचा पालिकेचा दावा

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी दिवाळीनिमित्ताने फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत असल्यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक १९० वर पोहचला आहे तर, आवाजाची पातळी ८४ डेसिबल एवढी सर्वाधिक मोजण्यात आली आहे. यामुळे ठाण्यातील हवा आणि ध्वनी प्रदुषणात वाढ झाल्याची बाब पुढे आली आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हवा आणि ध्वनी प्रदुषण कमी झाल्याचा तसेच हरित फटाके फोडण्याचे प्रमाण वाढल्याने धुलीकणांचे प्रमाण घटल्याचा दावा पालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाने केला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात दरवर्षी दिवाळी काळात हवा आणि ध्वनी प्रदुषणात वाढ होते. यंदाच्या दिवाळीतही हे चित्र कायम आहे. या काळात फटाके वाजण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. शहरात दिवाळीपुर्व काळात हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२७ इतका होता. दिवाळी काळात मात्र त्यामध्ये वाढ झाली असून शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक १९० एवढा नोंदवण्यात आला आहे. या काळात, आवाजाची पातळी ८४ डेसिबल एवढी सर्वाधिक मोजण्यात आली. दिवाळी पूर्व काळात ती ७१ डेसिबल एवढी होती. मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, उप पर्यावरण अधिकारी विद्या सावंत आणि ज्युनियर केमिस्ट निर्मिती साळगावकर यांच्या पथकाने दिवाळी पुर्व आणि दिवाळी कालावधीत हवेची गुणवत्ता तपासण्याबरोबरच ध्वनीचे मापन केले. त्यामध्ये शहरात दिवाळी काळात हवा आणि ध्वनी प्रदुषणात वाढ झाल्याचे समोर आले. हेही वाचा… जो गद्दारी करतो तो मुख्यमंत्री बनतो, उल्हासनगर भाजप जिल्हाध्यक्षाच्या वादग्रस्त वक्तव्याने तणाव गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले. हरित फटाक्यांचा वापर वाढला आहे. या वर्षीच्या तपासणीत दिवाळीच्या काळात ध्वनी आणि वायू या दोन्हीत वाढ नोंदवली गेली आहे. मात्र हे प्रमाण गेल्या दोन वर्षांपेक्षा कमी आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक १९० पर्यंत वाढला असला तरी ठाण्याची हवा मध्यम प्रदूषित स्तरावर आहे, असा दावा पालिकेने केला आहे. शहरात हवेतील धूलीकणांचे प्रमाण १६५ मायक्रोग्राम प्रति घनमीटर इतके आढळले आहे. २०२२ मध्ये धुलीकणांचे प्रमाण २४५ मायक्रोग्राम प्रति घनमीटर तर, २०२३ मध्ये २३० मायक्रोग्राम प्रति घनमीटर इतके होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा धुलीकणांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. हवा गुणवत्ता तपासणीदरम्यान, शहरात हरित फटाके फोडण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले असून यामुळेच शहरात धुलीकण प्रमाणात घट झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. हेही वाचा… बंडोबा थंडावताच संजय केळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचा केळकरांचा दावा ठाणे शहरात २०२२ मध्ये दिवाळी पुर्व काळात हवेचा गुणवत्ता निर्देशांक १३५ तर, दिवाळी काळात १९७ इतका होता. २०२३ मध्ये दिवाळी पुर्व काळात हवेचा गुणवत्ता निर्देशांक ११५ तर, दिवाळी काळात १८७ इतका होता. तर, २०२४ मध्ये दिवाळी पुर्व काळात हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२७ तर, दिवाळी काळात १९० इतका नोंदविण्याच आला आहे. तसेच शहरात २०२२ मध्ये दिवाळी पुर्व काळात ध्वनी पातळी ६७ डेसीबल तर, दिवाळी काळात ८९ डेसीबल इतकी होती. २०२३ मध्ये दिवाळी पुर्व काळात ध्वनी पातळी ६८ डेसीबल तर, दिवाळी काळात ७० डेसीबल इतकी होती. तर, २०२४ मध्ये दिवाळी पुर्व काळात ध्वनी पातळी ७१ डेसीबल तर, दिवाळी काळात ८४ डेसीबल इतकी आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.