NAGPUR

वर्धा : भर रस्त्यात तहसील कार्यालय, तिथेच नायब तहसीलदाराची नियुक्ती…

वर्धा : विविध आंदोलने करीत शासनास जागे करण्याचे काम विरोधी पक्ष प्रामुख्याने करीत असतो. सिंदी रेल्वे या गावात स्वातंत्र्यपूर्व काळापासून नगर परिषद अस्तित्वात आहे. म्हणून येथे तहसील कार्यलय व्हावे, अशी मागणी नागरिक अनेक वर्षांपासून करत आहेत. पण प्रश्न सुटला नसल्याने अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी आज भर रस्त्यात व भर पावसात आंदोलन छेडले. वांदिले यांच्या आंदोलनाला नागरिकांनी दमदार हजेरी लावली. तसेच या गावात उपजिल्हा रुग्णालय व पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा म्हणून या आंदोलनात मागणी झाली. त्याची शासनाने तत्पर दखल घेत आंदोलनस्थळी सेलू तहसीलदार यांना पाठविले. त्यांनी जिल्हाधिकारी कर्डीले यांच्याशी चर्चा करीत प्रथम नायब तहसीलदार यांची नियुक्ती करीत असल्याचे जाहीर केले. तहसील स्थापन करण्याची बाब वरिष्ठ स्तरावर मांडणार, मुख्यधिकारी नेमण्याची बाब सोडवू, अशी हमी मिळाली. सिंदिवासीयांना २३ किलोमीटर अंतर गाठून सेलू तहसील कार्यालय गाठावे लागते. त्याचा खर्च व शारीरिक दगदग सहन करण्याची आपत्ती दूर व्हावी, अशी मागणी कागदपत्रांची गरज असणारे विद्यार्थी, शेतकरी, वयोवृद्ध नागरिक करतात. सातत्याने ही ओरड होत आहे. पण आजच्या आंदोलनाने किमान नायब तहसीलदार मिळाला, याबद्दल लोकं आनंद व्यक्त करतात. हेही वाचा – पाणी भरलेले भांडे उघडले की डासांच्या लाखो अळ्या…नागपुरातील ६.४४ लाख घरांत… हेही वाचा – नागपूर : वन्यप्राण्यांना रोखणार ‘आभासी भिंत’; पेंचमध्ये मानव-वन्यजीव संघर्ष… यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर, तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, माजी न.पा उपाध्यक्ष सुधाकर खेडकर, इंडिया आघाडी संयोजक अविनाशजी काकडे, काँग्रेसचे प्रकाशचंद्र डफ व अन्य उपस्थित होते. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.