NAGPUR

फडणवीसांविरुद्ध लढणार….? अनिल देशमुखांचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले…

नागपूर : भाजपने गेल्या अनेक निवडणुकांमध्ये नागपुरातील पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात विजय संपादन केला आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या २५ वर्षांपासून करीत आहेत. देवेंद्र फडणवीस पश्चिम नागपूरमधून १९९९ ला पहिल्यांदा आमदार झाले. २००९ मध्ये मतदारसंघाची पुर्नरचना झाली. त्यानंतर ते दक्षिण-पश्चिम नागपूरचे नेतृत्व करीत आहेत. हा मतदारसंघ ओबीसीबहुल आहे. मात्र, भाजपने या मतदारसंघावर पकड निर्माण केली आहे. फडणवीस यांना या मतदारसंघात आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. संभावित उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. काँग्रेसकडून गेल्या निवडणुकीत आशीष देशमुख यांनी निवडणूक लढवली होती. आता ते भाजपमध्ये आहेत. आता येथे काँग्रेसकडून माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे इच्छुक आहेत. गुडधे यांचे वडील विनोद गुडधे यांनी भाजपकडून पश्चिम नागपूरचे नेतृत्व केले आहे. त्यानंतर ही जागा भाजपने फडणवीस यांना दिली. पुढे पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम असे या मतदारसंघाचे दोन भागात विभाजन झाले. दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते अनिल देशमुख यांना मैदानात उतरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. असे झाल्यास या मतदारसंघात विद्यमान गृहमंत्री फडवीस विरुद्ध माजी गृहमंत्री देशमुख अशी लढत होण्याची शक्यता आहे. हेही वाचा >>> राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले… देवेंद्र फडवीस यांनी खोट्या शपथपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाब निर्माण केला होता. त्याला भीक न घातल्याने तुरुंगात जावे लागले, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. त्यानंतर फडणवीस आणि देशमुख यांच्यात आरोपप्रत्यारोप झाले. तेव्हापासून देशमुख हे फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अनिल देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. तत्पूर्वी त्यांनी “मी कधीही एकटा निर्णय घेत नाही. पक्षाकडून जे काही आदेश दिले जातात, त्यावर मी निर्णय घेतो”, अशी प्रतिक्रिया दिली. देशमुख यांना फडणवीस विरुद्ध निवडणूक लढणार का, असा थेट प्रश्न विचारण्यात आला. परंतु त्यावर हो किंवा नाही, असे थेट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.