NAGPUR

बुलढाणा : बसचे इंजिन तापल्याने पाणी घालायला उतरला आणि इतक्यात…

बुलढाणा: मृत्यू कुणाला कसे गाठेल हे कुणीच सांगू शकत नाही. जळगाव जामोद येथील एका युवकाच्या बाबतीत नेमके असेच घडले. शैक्षणिक सहलीसाठी गेलेला युवक बसचे इंजिन गरम झाल्याने त्यात पाणी टाकण्यासाठी उतरला व इतक्यात विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा नजीकच्या महावितरणच्या विद्युत उपकेंद्राजवळ सोमवारी पहाटे ही दुर्घटना घडली. सहकाऱ्यांच्या डोळ्यादेखत त्या युवकाचा जीव गेला. शैक्षणिक सहलीतून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला एका भरधाव कारने जोरदार धडक दिली, या धडकेत बस समोर उभा राहून इंजिनमध्ये पाणी टाकत असलेल्या ३४ वर्षीय तरुणाला जोरदार मार लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मोताळा-नांदुरा मार्गावरील मोताळा येथील विद्युत सबस्टेशन जवळ २३ डिसेंबरला घडली. प्राप्त माहितीनुसार, जळगाव जामोद येथील लईक देशमुख यांचा शिकवणी वर्ग आहे. काल रविवारी, २२ डिसेंबर रोजी सकाळी ते शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल घेऊन छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे गेले होते. त्यांनी आपल्या सोबत खासगी संस्थेत लिपिक असलेला आपला मित्र मोहम्मद मुसअब अब्दुल जाबीर (वय ३२ वर्ष, राहणार जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा) यालाही घेतले. रविवारी, २२ तारखेला रात्री उशिरा जळगाव जामोदकडे परतत होते. दरम्यान स्कूल बसचे इंजीन गरम झाले. यामुळे बस चालकाने नांदुरा मार्गावरील मोताळा जवळच्या विद्युत उपकेंद्राजवळ बस थांबवली. चालकाने बस रस्त्याच्या खाली डाव्या बाजूला थांबविली. यावेळी मोहम्मद मुसअब खाली उतरुन इंजिनमध्ये पाणी टाकत असताना समोरून भरधाव आलेल्या कारने स्कूल बसला जोरदार धडक दिली. यात मोहम्मद मुसअब याला जोरदार मार लागला. त्याला तात्काळ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र कार्यरत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हेही वाचा – बुलढाणा : लोणार ग्रामीण रुग्णालयात अग्नितांडव, रुग्णाचा बेडवरच कोळसा; विडीमुळे… हेही वाचा – देणी लाखभर पैसे दिले टिचभर, बांधकाम खात्याचे काम कसे चालणार ? u या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात आरोपी कारचालक अखिलेश विजय चौधरी (राहणार नांदुरा, जिल्हा बुलढाणा) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती जळगाव जामोद येथे येऊन धडकताच एकच खळबळ उडाली. मृत मोहम्मद मुसअब यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.