NAGPUR

आरटीईमध्ये प्रवेश हवा, मग ही माहिती जाणून घ्या… ‘या’ तारखेपासून प्रक्रिया…

नागपूर: खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश सुविधा देणारी आरटीईची प्रवेशप्रक्रिया यंदा १८ डिसेंबरला शाळा नोंदणीपासून सुरू होणार आहे. जानेवारी महिन्यात विद्यार्थी नोंदणीला सुरुवात होईल. तर, मार्च महिन्यात प्रवेशासाठीची लॉटरी जाहीर होईल. यंदा पहिल्यांदाच जून-जुलै महिन्यात संपूर्ण प्रवेशप्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे नियमित वेळेत आरटीईअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांचे वर्गही सुरू होऊ शकतील. त्यामुळे पालकांनी आरटीईचा अर्ज भरण्यासाठी कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, अर्ज कसा भरावा याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया… बालकांच्या मोफत शिक्षणहक्क कायद्यांतर्गत विशेष करून इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा या राखीव ठेवल्या जातात. या सर्व जागांवर आरक्षित प्रवर्ग तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते. आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविण्यासंदर्भात शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या १८ डिसेंबरपासून शाळा नोंदणीला सुरुवात करण्यात येणार आहे. मार्च महिन्यात विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्याचे तसेच जून-जुलै महिन्यातच प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे, शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी पत्राद्वारे कळविले आहे. हेही वाचा : “आज जितक्या संघटना मंत्र्यांचा सत्कार करताहेत त्या माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या असत्या तर…”, भाजप नेत्याच्या मनातले अखेर… एकीकडे डिसेंबर महिन्यात सीबीएसई शाळांमध्ये प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होत असली, तरी आरटीई प्रवेशप्रक्रियेला मात्र मुहूर्त लागत नव्हता. अखेर यंदा संबंधित प्रवेशप्रक्रिया डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्वतयारी कार्यशाळा १५ जानेवारीऐवजी आता १५ डिसेंबरलाच घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे अंतिम प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा कालावधी १० एप्रिलवरून आता १० मार्च करण्यात आला आहे. -प्रवेशयोग्य मुलाच्या आई-वडिलांची सरकारी आयडी. जसे ड्राइविंग लाइसेंस, मतदान ओळख पत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्माचा दाखल किंवा पासपोर्ट. -मुलाचे आयडी कार्ड.–पालकांनी मुलाचे कोणतेही सरकारी कागदपत्र सादर करावे. -जात प्रमाणपत्र. जात प्रमाण पत्र आरटीई प्रवेशासाठी एक महत्वपूर्ण कागदपत्र आहे. -उत्पन्नाचा दाखला- पालकांचा चालु वर्षातील महसूल विभागाने दिलेला उत्पन्नाचा दाखला. -मुलाला जर विशेष वैद्यकीय सुविधेची गरज असेल तर तुम्हाला आरोग्य विभागाकडून उचित प्रमाण पत्र प्रदान केले जाईल. -बेघर मुले किंवा प्रवासी कामगारांच्या मुलांच्या प्रवेशासाठी एक प्रतिज्ञापत्र तयार करणे आवश्यक आहे. हे प्रतिज्ञापत्र कामगार विभाग, शिक्षण विभाग व महिला व बाल विकास विभागाकडून जारी केले जाईल. हेही वाचा : Video : ‘फ्लेमिंगो’ला आवडले लोणार सरोवर -मुलाचा पासपोर्ट साइज फोटो. -जर बालक अनाथ असेल तर माता-पिता दोघांचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे. -प्रवेशासाठी अंतिम तारखेच्या आधी सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागेल. आरटीई प्रवेशाची अंतिम तारीख सामान्यपणे प्रतिवर्ष एप्रिल महिन्याच्या दूसऱ्या किंवा अंतिम आठवड्यात असते. पालक स्वत:च्या जागेत राहात नसल्यास दुय्यम निबंधक कार्यालयात झालेला किमान ११ महिन्यांचा भाडेकरार, जन्मतारखेचा पुरावा (ग्रामपंचायत, महापालिका, नगरपालिकेचा दाखला, रुग्णालयातील एएनएम रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी, बालवाडीतील नोंदणीकृत दाखला) आरटीई फॉर्म ऑनलाइन भरु शकतात. यासाठी खाली दिलेल्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. शाळेची यादी माहिती झाल्यानंतर उमेदवारांना अधिकृत वेबसाइट rte25admission.maharashtra.gov.in वर जावे लागेल. होमपेज वर अधिसूचना आरटीई २५टक्के आरक्षण च्या खाली शाळेच्या यादीवर क्लिक करा. हेही वाचा : चंद्रपूर जिल्हा बँकेची ऑनलाइन परीक्षा वादात, परीक्षार्थ्यांना ‘हॅकिंग’चा संशय आता तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा त्यानंतर ब्लॉकमधील शाळेच्या यादीवर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर शाळेची यादी व प्रवेश फॉर्म तुमच्या कम्प्युटर स्क्रिनवर दिसू लागेल. हा फॉर्म राज्याच्या शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर एका निर्धारित कालावधीमध्ये उपलब्ध असतो. हा फॉर्म प्रत्येक वर्षी मर्यादित काळावधीसाठी वेबसाईट वर उपलब्ध असतो. मुदत संपल्यानंतर हा फॉर्म संकेतस्थळावर उपलब्ध नसतो. अर्ज भरताना पालकांना या गोष्टीची काळजी घ्यावी लागते की, अर्जामध्ये मुलाचे संपूर्ण नाव, ठिकाणाचे नाव, लिंग व अन्य माहिती अचून भरावी. अर्ज भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करुन फॉर्म सबमिट करा. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.