NAVIMUMBAI

शाळांच्या वेळेतील बदल कागदावरच! तूर्त शाळा जुन्या वेळापत्रकाप्रमाणेच सुरू राहणार

नवी मुंबई : शाळांच्या वेळा बदलण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी नवी मुंबईतील शाळांमध्ये सोमवारपासून होणार होती. मात्र शिक्षक संघटनांच्या तीव्र विरोधामुळे हा वेळबदल कागदावरच राहिला. मात्र यामुळे पालक विद्यार्थ्यांमध्ये सोमवारी गोंधळाची स्थिती होती. दरम्यान, तूर्त शाळा जुन्या वेळापत्रकाप्रमाणेच सुरू राहणार आहेत. हेही वाचा >>> नवी मुंबई : स्टॉलधारकांचे रस्त्यावरच बस्तान, एपीएमसी धान्य बाजारात रस्त्यावर साहित्य विक्री सोमवारी नेहमीच्या वेळेनुसारच शाळा भरवण्यात आल्या. शिक्षण संघटनांनी पालिकेच्या शिक्षण उपायुक्तांसमवेत बैठक घेत निर्णयाला विरोध केला. शिक्षक संघटनेचे रविंद्र फापाळे म्हणाले की या निर्णयाच्या अंमलबजावणीत अनेक त्रुटी आहेत. माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना दुपारी तर शिशु वर्गांची शाळा ७ तास असे बदल आहेत. ते चुकीचे असल्याचे बैठकीत मांडण्यात आले. सध्या जुनेच वेळापत्रक ठेवण्याची मागणी केली आहे. शिक्षक संघटनांची सोमवारी बैठक घेण्यात आली. त्यांच्या मागण्या वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार असून तूर्तास जुन्याच वेळापत्रकानुसार शाळा सुरू राहणार आहेत. अरुणा यादव शिक्षणाधिकारी, नवी मुंबई महापालिका None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.