NAVIMUMBAI

सट्टा बाजारात गुंतवणूक करा भरघोस परतावा मिळवा …. फसव्या जाहिरातीला बळी पडून १३ कोटी ५६ लाख गमावले

नवी मुंबई: सट्टा बाजाराशी काहीही संबंध नसताना केवळ सट्टा बाजारात गुंतवणूक करा भरघोस परतावा मिळावा अशा जाहिरात करत त्याला बळी पडून फसवणूक होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे . नवी मुंबईतील एका व्यक्तीची अशाच प्रकारे १३ कोटी ५६ लाख ४४९ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हेही वाचा >>> नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची पुन्हा चाचणी सूरु खारघर येथे राहणारे एक बांधकाम व्यावसायिकाच्या पाहण्यात एक जाहिरात आली होती. समाज माध्यमातील या जाहिरातीत सट्टा बाजारात गुंतवणूक करा आणि भरघोस नफा कमवा असे अमिश दाखवण्यात आले होते. त्याला भुलून त्या बांधकाम व्यावसायिकाने १६ जानेवारी ते ८ ऑगस्ट दरम्यान तब्बल १३ कोटी ५६ लाख ४४९ रुपयांची गुंतवणूक केली . मात्र परतवा अनेकदा मागून न दिल्याने शेवटी आपली फसवणूक होत असल्याची खात्री त्या व्यावसायिकाला पटली त्यामुळे त्यांनी या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्याची दखल घेत पोलिसांनी संबंधित अनोळखी चार आरोपींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. हेही वाचा >>> नवी मुंबई: निर्जनस्थळी गस्तीचा प्रस्ताव कागदावरच? सट्टा बाजरात पैसे गुंतवा भरघोस नफा मिळवा अशी जाहिरात समाज माध्यमातून केली जाते. त्यावर क्लिक केले कि एका व्हाटस अप समूहात तुमचा समावेश होतो. त्याठिकाणी सट्टा बाजारात गुंतवणूक विषयी मार्गदर्शक केले जाते. जर तुम्ही पैसे गुंतवणूक करण्यात स्वारस्य दाखवले तर अन्य एका समूहात तुमचा समावेश केला जातो तसेच एक ऍप डाऊन लोड करण्यास सांगितले जाते. त्या ऍप मध्ये तुम्ही किती गुंतवणूक केली .. सल्लागाराने ते पैसे कुठे गुंतवले आणि सध्या त्याचा परतावा किती मिळाला हे सर्व दिसते. सुरवातीला पैसे भरल्यावर काही दिवसात चांगला परतवा मिळतो. मात्र नंतर विविध कर सांगत हे कर भरले तर चौपट पाचपट परतावा मिळेल असे सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.