POLITICS

कारण राजकारण : नितीन राऊत यांच्या विरोधात भाजप उमेदवाराच्या शोधात

नागपूर : विदर्भातील काँग्रेसमधील मोठे नेते असलेले नितीन राऊत यांच्याविरोधात भाजप नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार असलेल्या राऊत यांना त्यांच्या मतदारसंघात शह देण्याचे मोठे आव्हान भाजप आणि महायुतीसमोर राहणार आहे. राऊत यांच्याविरोधात लढण्यासाठी भाजपमधून चार जण इच्छुक असले तरी लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला मिळालेले मताधिक्य राऊत विरोधकांना डोळ्यांसमोर ठेवावे लागणार आहे. नागपूर शहरात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात विद्यामान आमदार, माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत पुन्हा निवडणूक लढवण्याची शक्यता असून त्यांच्या विरोधात भाजपमध्ये माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांच्यासह चार जण इच्छुक आहेत. हेही वाचा >>> TISS Banned PSF: डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेवर TISS मुंबईने बंदी का आणली? विद्यामान आमदार डॉ. नितीन राऊत यांनी १९९९ पासून सलग तीन वेळा येथून विजय मिळवला होता. पण २०१४ मध्ये त्यांचा भाजपचे डॉ. मिलिंद माने यांनी पराभव करून काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला छेद दिला होता. २०१९ मध्ये पुन्हा राऊत यांनी बाजी मारली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य आहे. त्यामुळे राऊत पुन्हा लढतील अशी शक्यता आहे. दुसरीकडे ही जागा पुन्हा जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. २०१४ मध्ये ही जागा भाजपने दलित मतांमध्ये विभाजन झाल्याने जिंकली होती. यावेळी बसपने काँग्रेसपेक्षा जास्त मते घेतली होती. काँग्रेसला २७.५४ टक्के आणि बसपाला ३०.३७ टक्के मिळाली होती. तर भाजपचे डॉ. मिलिंद माने यांनी ३७.९३ टक्के मते घेत विजय संपादन केला होता. यावरून अनुसूचित जातीच्या मतांचे विभाजन झाले तरच भाजपला येथे संधी निर्माण होऊ शकते हे येथे स्पष्ट आहे. हे समीकरण बघता भाजप धुरीण काय डावपेच आखतात याकडे लक्ष लागले आहे. भाजपकडून माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी नगरसेवक संदीप गवई, संदीप जाधव आणि अॅड. धर्मपाल मेश्राम इच्छुक आहेत. हेही वाचा >>> काँग्रेस – नॅशनल कॉन्फरन्स आघाडी, तरी काश्मीर खोऱ्यात मैत्रीपूर्ण लढती? गेल्या काही वर्षांत या मतदारसंघात बसपाचा जनाधार कमी होत असल्याचे दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीची येथे संघटनात्मक बांधणी नाही. तर रिपब्लिकन पक्ष (खोरिप) पासून देखील मतदार दूर गेेले आहेत. त्यामुळे येथे काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढाई होणे निश्चित आहे. काँग्रेसने विधानसभेसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले. माजी नगरसेवक मनोज सांगोळे आणि संदीप सहारे यांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे. असे असले तरी विद्यामान आमदार नितीन राऊत यांना पुन्हा एकदा काँग्रेस रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. भाजपने मात्र उमेदवारीबाबत अद्यापही पत्ते खुले केलेले नाहीत. पक्षाचे पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षण झाले. दुसऱ्या सर्वेक्षणानंतर त्याचा अहवाल प्राप्त होणार आहे. सध्यातरी भाजपने इच्छुकांना ‘वेट अँड वॉच’ एवढेच संकेत दिले आहेत अशी स्थिती आहे. उत्तर नागपूरमध्ये अनुसूचित जातीचे सुमारे ३५.४३ टक्के, अनुसूचित जमातीचे सुमारे ९.०८ टक्के आणि मुस्लीम समाजाचे सुमारे १४.६ टक्के मतदार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप, बसपा, एआयएमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसने ४४.३ टक्के मते घेऊन ही जागा भाजपकडून खेचून आणली होती. भाजपला ३३.७ टक्के आणि बसपाला ११.९ टक्के मते मिळाली. इतर पक्षाला दहा हजार मतांचा टप्पाही गाठता आला नव्हता. २०१४ मध्ये बसपच्या (किशोर गजभिये) बाजूने उभा राहिलेला आंबेडकरी मतदार पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळल्याचे वरील आकडेवारीवरून दिसून आले. लोकसभा निवडणुकीत उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी यांनी ९० हजार १९१ मते घेतली, तर काँग्रेसचे विकास ठाकरे यांना एक लाख २२ हजार ४०६ मते मिळाली. भाजप येथे काँग्रेसपेक्षा ३२ हजार २१५ मतांनी मागे राहिला. तर बसपाला केवळ ६ हजार ६९२ मते घेता आली. पक्ष मिळालेली मते टक्केवारी काँग्रेस- ८६,८२१ (४४.३), भाजप- ६६,१२७ (३३.७), बसपा- २३,३३३ (११.९) एआयएमआयएम- ९,३१८ (४.७) , व्हीबीए- ५,५९९ (२.८) None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.