THANE

ठाण्यातील ९३ हेक्टर कांदळवनाचा नाश; सरकारच्या ‘वन सर्वेक्षण अहवाला’तून धक्कादायक माहिती उजेडात

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील तब्बल ९३ हेक्टर कांदळवन क्षेत्र २०२१ ते २०२३ या दोन वर्षांमध्ये नष्ट झाल्याचे ‘भारतीय वन सर्वेक्षण अहवाल २०२३’मधून समोर आले आहे. या अहवालानुसार ठाणे जिल्ह्याबरोबरच मुंबई शहर आणि उपनगरातील कांदळवनेही नष्ट झाल्याचे उघडकीस आले आहे. झाडे-झुडपे, ताड जातीची झाडे, औषधी वनस्पती, जमिनीलगत वाढणाऱ्या प्रजातींचा समावेश असलेले कांदळवनाचे क्षेत्र पर्यावरण आणि सागरी परिसंस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मानले जाते. नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘भारतीय वन सर्वेक्षण अहवाल-२०२३’मध्ये ठाणे जिल्ह्यात २०२१ ते २०२३ या कालावधीत ९३ हेक्टर कांदळवन क्षेत्र नष्ट झाले आहे. मुंबई उपनगरांतील १८ हेक्टर, तर मुंबई शहरातील ३ हेक्टर कांदळवन क्षेत्र नष्ट झाल्याचेही अहवालात नमुद करण्यात आले आहे. कोकणातील चार जिल्ह्यांचा विचार करता रायगडमध्ये ७०० हेक्टर, पालघर ४०० हेक्टर, रत्नागिरी १०० हेक्टर आणि सिंधुदुर्ग ५२ हेक्टरने कांदळवनाचे क्षेत्र वाढले आहे. हेही वाचा >>> राज्यात ऐन हिवाळ्यात पाऊस, गारपीट होणार? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये काय होणार देशातील कांदळवन क्षेत्राची व्याप्ती २०२१च्या तुलनेत २०२३ मध्ये ७०० हेक्टरने (-७.४३ चौ.किमी) कमी झाली आहे. गुजरातने दोन वर्षांत ३,६३९ हेक्टर क्षेत्र गमावले असून इतर राज्यांत त्यात किरकोळ वाढ झाली आहे. महाराष्ट्राने १,२३९ हेक्टर वाढीसह अव्वल स्थान पटकावले आहे. अत्यंत दाट कांदळवन क्षेत्राच्या यादीत पश्चिम बंगाल (९८,१०० हेक्टर) आघाडीवर आहे. त्याखालोखाल अंदमान आणि निकोबार ३९,८००, ओडिशा ८१०० हेक्टर, तामिळनाडू १०० हेक्टर, तर कर्नाटकमध्ये ११ हेक्टर अत्यंत दाट कांदळवन क्षेत्र आहे. पायाभूत सुविधांच्या नावाखाली होत असलेल्या ढिसाळ विकासकामांमुळे ठाणे जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील कांदळवनाचे नुकसान होत आहे. जमीन बळकावणे आणि भूमाफियांची प्रकरणे यांची तपासणी करणे आवश्यक आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सरकारची योजना अनेक बारगळली आहे. – बी. एन. कुमार , संचालक, नॅटकनेक्ट फाउंडेशन None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.