THANE

मराठी कुटुंबांना मारहाण करणाऱ्या मुख्यसुत्रधारासह मारेकऱ्यांना ‘मोक्का’ लावा, मराठी कुटुंबीयांची पोलिसांकडे मागणी

कल्याण – येथील योगीधाममधील आजमेरा सोसायटीतील धीरज देशमुख यांच्यासह कुटुंबीयांना संघटितपणे मारहाण करणाऱ्या आठ ते दहा जणांसह या प्रकरणातील मुख्य मार्गदर्शक म्होरक्याला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोक्का) कायद्याचे कलम लावा. या कायद्यांतर्गत मारेकऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी आजमेरा सोसायटीतील मारहाण झालेल्या मराठी कुटुंबातील धीरज देशमुख यांनी कल्याणच्या अपर पोलीस आयुक्तांकडे सोमवारी केली. पोलिसांनी या प्रकरणात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न हे कलम लागू न करता कर्तव्यात कसूर केली. यामुळे मारेकऱ्यांना या त्रृटीचा तपासात लाभ होऊ शकतो. त्यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी. कट करून हा हल्ला करण्यात आला. या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार शासकीय अधिकारी अखिलेश शुक्ला यांनी बाहेर कोठेही न जाता बाहेरून आठ ते दहा मारेकरी बोलविले. त्यांनी कट करून आम्हा कुटुंबीयांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी धीरज देशमुख यांनी पोलीस तक्रारीत केली आहे. हेही वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आमची पॅशन – जितेंद्र आव्हाड मराठी कुटुंबीयांना मारहाण करणाऱ्या दहा जणांच्या टोळीला राजकीय आश्रय असलेले काही पुढारी पडद्यामागून साहाय्य करत आहेत. यामध्ये कल्याण पूर्वेतील एक सराईत गुन्हेगार सहभागी असल्याचा संशय देशमुख यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे. या प्रकारची योगीधाम परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे, असे देशमुख यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेऊन या गुन्ह्याचा संघटित गुन्हेगारी (मोक्का) कायद्याने तपास करण्यात यावा, अशी मागणी धीरज देशमुख यांनी अपर पोलीस आयुक्तांसह साहाय्यक पोलीस आयुक्तांकडे केली आहे. हेही वाचा – कल्याण डोंबिवली पालिकेतील ३४३ कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती गेल्या आठवड्यात धूप अगरबत्ती लावण्यावरून आजमेरा सोसायटीत लता कळवीकट्टे आणि शासकीय अधिकारी अखिलेश शुक्ला कुटुंबीयांमध्ये वाद झाला. या वादातून मराठीचा मुद्दा पुढे आला. त्यानंतर शुक्ला यांच्या इशाऱ्यावरून दहा जणांनी मराठी कुटुंबीयांना मारहाण केली. धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. विधीमंडळात या घटनेचे पडसाद उमटले. पर्यटन महामंडळाच्या सेवेतील व्यवस्थापक अखिलेश शुक्ला यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबित केल्याची घोषणा केली. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.