THANE

धर्मांतराविरूद्ध उल्हासनगरात मोर्चा, मराठी मुलीच्या धर्मातर प्रकरणानंतर संघटना एकटवल्या

लोकसत्ता प्रतिनिधी उल्हासनगर : उल्हासनगरात झालेल्या हिंदू धर्मांतराच्या घटनेनंतर शनिवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. कैलास कॉलनी, समता नगर येथून तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मोर्चात हिंदू धर्मांतराच्या घटनांविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. काही महिन्यांपूर्वी कुर्ला कॅम्प येथे राहणाऱ्या कल्पना चौधरी यांची मुलगी दृष्टी चौधरी हिने धर्मांतर केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात बनावट कागदपत्रे सादर करत धर्मांतर केल्याचा आणि फूस लावल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. त्यामुळे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दृष्टी चौधरी आणि सलीम चौधरी अशा दोघांना अटक केली होती. या घटनेनंतर शहरात संतापाचे वातावरण होते. त्यामुळे या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शनिवारी उल्हासनगरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चापूर्वी आमदार नितेश राणे यांनी कल्पना चौधरी आणि त्यांच्या परिवाराची भेट घेऊन समतानगर परिसरातील धर्मांतर प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर उल्हासनगर तहसिल कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. आणखी वाचा- बदलापुरात तीन वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतच अत्याचार; आरोपी अटकेत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात हिंदू संघटनांनी धर्मांतरासंबंधी विविध मुद्द्यांवर कारवाईची मागणी केली. स्थानिक पोलीस आणि उल्हासनगर महानगरपालिका विशिष्ट समुदायाच्या बेकायदेशीर कारवायांवर कारवाई करण्यात उदासीन असल्याचा आरोप यावेळी राणे यांनी केला. अनेक बेकायदेशीर घरे भाड्याने देण्यात आली आहेत. जिथे अनधिकृतरित्या लोक राहतात. या भागातील हिंदू तरुणांचे आणि तरुणीचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात आहे, असेही राणे म्हणाले. या प्रकरणाचा तपास आता दहशतवादी विरोधी पथकाकडे गेला असला तरी आम्ही आमच्या बहिणीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे राणे यावेळी म्हणाले. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.