THANE

ठाणे : इस्कॉन मंदिरातील सोहळ्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता

लोकसत्ता प्रतिनिधी ठाणे : बाळकुम येथे काही महिन्यांपूर्वी इस्कॉन मंदिर उभारण्यात आले आहे. कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने या मंदिरात ५० हजाराहून अधिक भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील बाळकुम, कापूरबावडी, कोलशेत, ढोकाळी भागात मोठ्या कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी रविवारी आणि सोमवारी या दोन दिवसांसाठी वाहतुक बदल लागू केले आहेत. बाळकुम येथील पिरॅमल वैकुंठ परिसरात इस्कॉन मंदिर आहे. या मंदिरात दररोज नागरिक दर्शनासाठी जात असतात. सोमवारी कृष्ण जन्माष्टमी आहे. त्यामुळे इस्कॉन मंदिरामध्ये जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यासह विविध भागातून रविवारी (आज) पासून सोमवारी भाविक या मंदिरारामध्ये दर्शनासाठी येण्याची शक्यता मंदिर प्रशासनाने व्यक्त केली आहे. बाळकुम, कोलशेत, ढोकाळी भागात गेल्याकाही वर्षांमध्ये मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. त्यामुळे येथे नागरी वस्ती देखील वाढली आहे. आणखी वाचा- कृष्ण अष्टमीच्या दिवशी डोंबिवलीतील वर्दळीचे रस्ते वाहतुकीसाठी बंद तसेच याच भागात ठाणे महापालिकेचे सेंट्रल पार्क हे उद्यान आहे. या उद्यानात देखील नागरिक येत असतात. असे असले तरी येथील रस्ते अद्यापही अरुंद आहेत. त्यामुळे वाहन चालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागतो. इस्कॉन मंदिरातील कार्यक्रमांमुळे भाविकांची वाहने आल्यास त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर होऊन कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी या भागात वाहतुक बदल लागू केले आहेत. रविवारी (आज) सकाळी ७ वाजल्यापासून सोमवारी रात्री ११ वाजेपर्यंत हे वाहतुक बदल लागू असणार आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.