ASTROLOGY

२३ डिसेंबर पंचांग: कोणाला पैशांचा फायदा तर कोणी घ्यावा धाडसाचा निर्णय? कशी होईल तुमच्या आठवड्याची सुरुवात? वाचा राशिभविष्य

23 December Rashi Bhavishya In Marathi : २३ डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी सोमवारी सायंकाळी ५ वाजून ८ मिनिटांपर्यंत राहील. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजून ५४ मिनिटांपर्यंत सौभाग्य योग राहील. तसेच उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळी ९ वाजून ९ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर हस्त नक्षत्र दिसेल. राहू काळ ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असेल. तर मेष ते मीनची आठवड्याची सुरुवात कशी होईल हे आपण जाणून घेणार आहोत. मेष:- धार्मिक वा आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन कराल. नवीन ज्ञान गोळा करण्याकडे कल राहील. अनेक प्रश्नांची उकल काढता येईल. स्वत:साठी वेळ काढावा. तज्ञ लोकांशी संपर्क साधावा. वृषभ:- आरोग्याची काळजी घ्यावी. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. स्त्रीवर्गाशी जरा जपून वागावे. सहकार्‍यांशी सामंजस्याने वागावे. उगाचच हुरळून जाऊ नका. मिथुन:- आजचा दिवस ताजातवाना असेल. नवविवाहितांना सरप्राइज मिळेल. व्यवसायिकांना चांगला फायदा मिळेल. वरिष्ठांकडून दाद मिळेल. चारचौघात कौतुक केले जाईल. कर्क:- विरोधकांपासून सावध राहावे. छुपे शत्रू त्रास देऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्यावी. योग साधना करावी. मनाच्या चंचलतेला आवर घालावी. सिंह:- व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस फलदायी असेल. नवीन संधी चालून येईल. विद्यार्थ्यांना नवीन आव्हान स्वीकारता येईल. तुमची एकाग्रता वाढेल. जोडीदाराला खुश ठेवता येईल. कन्या:- जमिनीशी संबंधित व्यवहार पार पडेल. कौटुंबिक जीवनात शुभ परिणाम पहायला मिळतील. घरातील लोकांबरोबर चांगला वेळ घालवाल. साफसफाईची कामे काढाल. मन प्रसन्न राहील. तूळ:- पराक्रमात वाढ होईल. तुमची ऊर्जा पाहून लोक अचंबित होतील. सहकारी वर्ग तुमच्यावर प्रभावित होईल. कामासंबंधी प्रवास करावा लागेल. ओळखीचे लोक भेटतील. वृश्चिक:- देणी फेडता येतील. तसेच नवीन गुंतवणूक करता येईल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. बोलण्यात गोडवा ठेवाल. आवडीच्या गोष्टी कराल. धनू:- बुद्धीच्या जोरावर नवीन कामे कराल. दिवस मनाजोगा घालवाल. आवडते छंद जोपासाल. मानसिक दृष्ट्‍या सक्षम व्हाल. धार्मिक कामात सहभागी व्हाल. मकर:- प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. वायफळ खर्च केला जाऊ शकतो. जुन्या विचारात अडकून राहू नका. नकारात्मकता दूर सारावी. दूरच्या नातेवाईकाशी संपर्क होईल. कुंभ:- विविध स्तरातून लाभ संभवतो. मनातील इच्छा पूर्ण कराल. जवळच्या मित्रांची गाठ घ्याल. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकेल. शेअर बाजारातून नफा मिळवू शकाल. मीन:- रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच वैयक्तिक काम तडीस न्याल. वडीलांशी संबंध सुधारतील. कामात चंचलता आड आणू नका. हातातील कामातून समाधान मिळेल ज्योतिषी विद्याधर करंदीकर None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.