ASTROLOGY

२४ डिसेंबर पंचांग: बुधाचा ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींसाठी ठरेल मंगलमय; धनलाभ, इच्छापूर्ती ते नात्यात गोडवा; वाचा तुमचा कसा असेल मंगळवार

Daily Horoscope 24 December 2024 in Marathi : २४ डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. नवमी तिथी मंगळवारी संध्याकाळी ७ वाजून ५३ मिनिटांपर्यंत राहील. शोभन योग रात्री८ वाजून ५४ मिनिटांपर्यंत राहील. तसेच हस्त नक्षत्र मंगळवारी दुपारी १२ वाजून १७ मिनिटांपर्यंत राहील. याशिवाय सकाळी ८ वाजून २६ मिनिटांनी बुध ग्रहाचा ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश होणार आहे. तर राहू काळ दुपारी ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजेपर्यंत असणार आहे. तर बुधाचा ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश १२ पैकी कोणत्या राशीसाठी सुख-समृद्धीचा ठरेल हे आपण जाणून घेऊया… मेष:- सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आजूबाजूच्या लोकांना बरोबर घेऊन चालाल. धार्मिक कार्याची आवड निर्माण होईल. कुटुंबातील लोकांसमवेत प्रवास कराल. आर्थिक प्रगती साधता येईल. वृषभ:- आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात. व्यायामाला कंटाळा करू नका. अचानक धनलाभाची शक्यता. वैवाहिक जीवनात सुसंवाद ठेवावा. फार काळजी करत बसू नये. मिथुन:- लहान व्यवसायिकांना लाभ होईल. सामाजिक व्याप्ती वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल. जोडीदाराबरोबर मजेत वेळ घालवाल. तुमचे विचार सकारात्मक ठेवा. कर्क:- कार्यक्षेत्रात सावधानता बाळगा. विरोधकांपासून सावध राहावे. कोणावरही जास्त विश्वास ठेऊ नका. सामाजिक स्तरावर बोलताना भान राखावे. कोणालाही शब्द देऊ नका. सिंह:- प्रेम जीवनात सुखद अनुभव मिळतील. सहवासाचा आनंद लुटाल. मनातील भावना मांडता येतील. आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न यश देतील. कन्या:- आज देवीचा आशीर्वाद मिळेल. मनातील इच्छेला मूर्त रूप द्याल. कौटुंबिक जीवनात समाधान लाभेल. कामाच्या ठिकाणी एकाग्रता ठेवावी. घरातील टापटीप कटाक्षाने पाळाल. तूळ:- आज तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. विना संकोच बोलाल. जवळच्या मित्रांना घरी बोलवाल. निसर्गरम्य ठिकाणाला भेट द्याल. खाण्यावर नियंत्रण ठेवावे. वृश्चिक:- बोलण्यातून सामाजिक मान वाढेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. आवडीचे पदार्थ चाखाल. कौटुंबिक जीवनात काही सुखद अनुभव येतील. दिवस मनाजोगा घालवाल. धनू:- आज आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी कराल. आवडते छंद जोपासाल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. बुद्धिमत्ता आणि विवेक यांचा मेळ घालावा. सूक्ष्म निरीक्षणावर भर द्यावा. मकर:- आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खर्चात वाढ संभवते. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. ध्यानधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करावे. कचेरीची महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कुंभ:- आजचा दिवस आनंदात जाईल. बरेच दिवस रेंगाळत असलेली इच्छा पूर्ण होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. मित्रांची उत्तम साथ मिळेल. व्यापार्‍यांना चांगला आर्थिक लाभ होईल. मीन:- कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. सहकार्‍यांशी होणारे मतभेद संपुष्टात येतील. खेळीमेळीचे वातावरण राहील. घाईघाईने निर्णय घेऊ नका. घरासाठी थोडा वेळ काढावा लागेल. ज्योतिषी विद्याधर करंदीकर None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.