Daily Horoscope 20 December 2024 : २० डिसेंबरला आज मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील उदया तिथी पंचमी आणि शुक्रवार आहे. पंचमी तिथी शुक्रवारी सकाळी १० वाजून ४९ मिनिटांपर्यंत असेल, त्यानंतर त्यानंतर षष्ठी तिथी सुरू होईल. २०डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून ११ मिनिटांपर्यंत विश्वकुंभ योग राहील. तर मघा नक्षत्र शुक्रवारी रात्री ३ वाजून ४७ मिनिटांपर्यंत जागृत राहील. दरम्यान विश्वकुंभ योगामुळे कोणत्या राशींना फायदा होईल तर कोणत्या तोटा जाणून घेऊ.. मेष:-स्त्रियांनी आपली मते ठामपणे मांडवीत. हाताखालील लोक चांगले भेटतील. विद्यार्थी वर्गाला चांगला दिवस. कामे सुरळीत पार पडतील. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील. वृषभ:-संभ्रमित राहू नका. प्रेमातील गैरसमज दूर करावेत. घरगुती कामासाठी वेळ काढावा. कौशल्याच्या जोरावर बाजी मारता येईल. मित्रांशी सुसंवाद साधावा. मिथुन:-नवीन गोष्टी आत्मसात कराल. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील. चिकाटी सोडू नका. जोडीदाराशी मतभेद संभवतात. लहान-सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका. कर्क:-घरगुती अडचणींवर तोडगा काढाल. घरगुती कामाची धांदल राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहू शकते. नातेवाईक भेटीला येतील. दिवस दगदगीत जाईल. सिंह:-नोकरीच्या प्रयत्नाला यश येईल. तुमच्या हातात नवीन अधिकार येतील. दिवस चांगला जाईल. मुलांचा अभिमान वाटेल. सामाजिक प्रतिमा सुधारेल. कन्या:-आवक चांगली राहिली तरी खर्च आटोक्यात ठेवावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढता येईल. हातातील कामे यशस्वीरित्या पार पडतील. जबाबदारीची जाणीव ठेऊन वागावे. तूळ:-कामाचा उत्साह वाढेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. दिवस धावपळीत जाईल. चटकन निराश होऊ नका. चिकाटी सोडून चालणार नाही. वृश्चिक:-मनाचे सामर्थ्य वाढवावे. झोपेची तक्रार जाणवेल. जवळच्या व्यक्तिपाशी मन मोकळे करावे. नातेवाईकांना मदत कराल. रागावर नियंत्रण ठेवावे. धनू:-कामाचा पसारा आवरता ठेवावा. खात्री केल्याशिवाय समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. अति अपेक्षा बाळगू नका. ध्यानधारणेत मन रमवा. कौटुंबिक गोष्टीत शांतता बाळगावी. मकर:-अतिरिक्त काम अंगावर घेऊ नका. वेळ आणि काम यांचे नियोजन करावे. इतरांना मदत करण्यात समाधान मनाल. कामातील क्षुल्लक अडचणी दूर करता येतील. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी. कुंभ:-तूर्तास कोणत्याही निर्णयाची घाई करू नका. लहान प्रवास घडतील. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. अधिकारी लोकांची गाठ पडेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. मीन:-जोडीदाराशी वाद वाढवू नका. वैवाहिक जीवनात ताळमेळ साधावा लागेल. अचानक धनलाभ संभवतो. एखादी चांगली संधी चालून येऊ शकते. सबुरीने व शांततेने निर्णय घ्यावा. (ज्योतिषी विद्याधर करंदीकर) None
Popular Tags:
Share This Post:
What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 19, 2024
-
- December 19, 2024
-
- December 19, 2024
Featured News
Latest From This Week
वयाच्या ३५ वर्षानंतर चमकू शकतात ‘या’ लोकांचे नशीब, शनि देवाची दिसून येईल कृपा
ASTROLOGY
- by Sarkai Info
- December 16, 2024
पुढील १०३ दिवस शनी देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार धनसंपत्ती आणि प्रत्येक कामात यश
ASTROLOGY
- by Sarkai Info
- December 16, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.