ASTROLOGY

दसऱ्यानंतर गुरू शुक्र निर्माण करतील समसप्तक योग, ‘या’ चार राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अपार पैसा अन् धनसंपत्ती

Samsaptak yog : ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजून ४९ मिनिटांनी धन संपत्ती, आकर्षण, सुख सुविधाचे दाता शुक्र तुळ राशीमधून वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तसेच गुरू ग्रह वृषभ राशीमध्ये विराजमान आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा गुरू आणि शुक्र एक दुसऱ्याच्या सातव्या स्थानावर असतात तेव्हा समसप्तक योग निर्माण होतो. त्यामुळे १३ ऑक्टोबरला तयार होणारा हा दुर्लभ योग चार राशींसाठी फायद्याचा ठरू शकतो. जाणून घेऊ या, त्या चार राशी कोणत्या आहेत? (After Dussehra Jupiter and Venus will create Samsaptak yog lucky four zodiac signs will get more money and wealth) समसप्तक योग हा वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायद्याचा ठरणार आहे. कुटुंबातील नातेसंबंध दृढ होतील. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. पगारात वाढ होऊ शकते. जे लोक नवीन व्यवसाय करण्याचा विचार करत आहे. त्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे. या दरम्यान या राशीच्या लोकांना वाहन सुख प्राप्त होऊ शकते. हेही वाचा : तब्बल एक वर्षांनंतर सूर्य करणार वृश्चिक राशीत प्रवेश! ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश समसप्तक योग सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. यांच्या जीवनात भरपूर आनंद येईल. धनलाभाचे नवीन स्त्रोत वाढतील. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा येऊ शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते. अडकलेली धन संपत्ती या लोकांना मिळू शकते. धनु राशीच्या लोकांना समसप्तक योग खूप फायद्याचा ठरू शकतो. सुख सुविधांमध्ये वृद्धी होऊ शकते. कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी मिळू शकतात. धनलाभाचे योग निर्माण होऊ शकतात. करिअरच्या दृष्टीकोनातून आनंदाची बातमी मिळेन. अध्यात्मिक कार्यात आवड निर्माण होईल. अडकलेले काम पूर्ण होईल. हेही वाचा : ९ ऑक्टोबर पंचांग: कालरात्री देवी मेष, कन्यासह ‘या’ राशींना करणार प्रसन्न; जोडीदाराची साथ ते प्रत्येक कामात मिळेल यश; वाचा तुमचे राशिभविष्य मकर राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होईल. जे विद्यार्थी स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे, त्यांना भरपूर यश मिळेल. सरकारी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या लोकांसाठी हा काळ उत्तम आहे. जर हे लोक आजारांचा सामना करत असाल तर त्यांची समस्या दूर होईल. या लोकांना गुंतवणूक केल्यावर चांगला नफा मिळू शकतो. (टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे) None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.