ASTROLOGY

१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी देवीची साथ, १२ पैकी कोणत्या राशींचा सुरु होणार आज सुवर्णकाळ? वाचा तुमचं भविष्य

10th October Rashi Bhavishya & Panchang : आज १० ऑक्टोबर रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी आहे. सप्तमी तिथी गुरुवारी दुपारी १२ वाजून ३२ मिनिटांपर्यंत राहील. आज अतिगंड योग जुळून येईल. शुक्रवारी पहाटे ५ वाजून ४१ मिनिटांपर्यंत पूर्वाषाढ नक्षत्र राहील. तर राहू काळ दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असेल. याशिवाय गुरु वृषभ राशीत वक्री होईल, म्हणजेच उलट चाल चालेल. त्याचप्रमाणे उद्या नवरात्रीचा आठवा दिवस आहे. नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीची पूजा केल्याने मन, शरीर शुद्ध होते. महागौरी देवी भक्तांना सकारत्मक मार्गाच्या दिशेने घेऊन जाते. तर आज कोणासाठी यशाचे नवीन मार्ग उघडणार, कोणच्या आयुष्यात सुवर्णकाळ सुरु होणार हे आपण जाणून घेऊया.. मेष:- आजचा दिवस आव्हानात्मक असू शकेल. अधिक काम अंगावर पडू शकते. आज काहीशी धावपळ करावी लागू शकते. कामाचे पूर्ण नियंत्रण आपल्या हाती घ्यावे. इतरांच्या विश्वासाला पात्र ठराल. वृषभ:- घाईने निर्णय घेऊ नयेत. नवीन कामासाठी घाई करू नये. स्पर्धकांवर बारीक लक्ष ठेवावे लागेल. सारासार विचार हितकारक ठरेल. कुटुंबाला आधी प्राधान्य द्यावे. मिथुन:- व्यावसायिकांना चांगला दिवस. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. आर्थिक पातळी संतुलित राहील. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. मित्रांच्या गाठी-भेटी संभवतात. कर्क:- विवाहाची बोलणी पुढे सरकतील. सामाजिक मान वाढेल. संपर्कातील लोकांशी जवळीक वाढेल. एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकाल. समोरच्या व्यक्तीवर आपला प्रभाव पडेल. सिंह:- प्रवास संभवतो. संवादाने प्रश्न सुटू शकतील. नवीन ओळखी मित्रत्वात बदलतील. काही नवीन गोष्टी अनुभवास येतील. विरोधक परास्त होतील. कन्या:- प्रलंबित येणी वसूल होतील. योग्य कामासाठी पैसा खर्च कराल. ज्येष्ठांच्या सेवेची संधी दवडू नका. मानसिक शांतता लाभेल. मित्रांची योग्य वेळी मदत होईल. तूळ:- थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. हितशत्रूंकडे दुर्लक्ष करू नका. दिवस आव्हानात्मक असेल. धावपळ करावी लागू शकते. दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती नियंत्रणात येईल. वृश्चिक:- वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. आपले मत इतरांना पट‍वून द्याल. व्यापारी वर्गाला शुभ दिवस. एखादा महत्त्वाचा निर्णय घेता येईल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. धनू:- एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होईल. कामे सुरळीत पार पडतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. धनलाभाचे योग जुळून येतील. मकर:- समस्यांचे निराकरण होईल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. उगाच नसत्या काळज्या करू नका. हातातील कामे योग्य रीतीने पार पडतील. सकारात्मक परिणाम दिसू लागतील. कुंभ:- गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आजचा दिवस यशकारक ठरेल. मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल. लाभाच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. मीन:- व्यावसायिक गुंतवणूक लाभदायक ठरेल. जोडीदाराची साथ मोलाची ठरेल. मिळकतीचे नवीन स्त्रोत उपलब्ध होतील. पालकांचे शुभाशिर्वाद मिळतील. चांगला आर्थिक लाभ होईल. ज्योतिषी विद्याधर करंदीकर None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.