ASTROLOGY

Shani Dev : दिवाळीपूर्वी ‘या’ तीन राशींच्या लोकांना शनिदेव देणार बोनस आणि इंक्रीमेंट, चमकणार यांचे नशीब

Shani Dev : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनि देव हा अत्यंत हळुवारपणे चालणारा ग्रह मानला जातो. शनि देव जेव्हा चाल बदलतो, तेव्हा राशिचक्रातील १२ राशींवर प्रभाव पडतो. शनि देवाला कर्मदेव सुद्धा संबोधले जाते जो प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. सध्या शनि कुंभ राशीमध्ये वक्री अवस्थेत विराजमान आहे. शनि देव १५ नोव्हेंबरला कुंभ राशीतच मार्गक्रमण करणार आहे आणि तीन राशींवर २०२५ पर्यंत कृपा दृष्टी दाखवणार आहे. त्या तीन राशी कोणत्या आहेत, हे आज आपण जाणून घेणार आहोत. (Shani will give bonuses and increments to the people of these three zodiac signs Before Diwali) धनु राशीच्या तिसऱ्या भावात मार्गी होऊन शनिदेव या राशीच्या लोकांवर कृपा दाखवेन. या लोकांची करिअरमध्ये खूप प्रगती होईल. या लोकांच्या कामाचे सर्वत्र कौतुक केले जाईल आणि बॉस आनंदी होऊन यांचे प्रमोशन करू शकतात. नोकरीच्या शोधात असणार्‍या लोकांना खूप चांगली नोकरी मिळू शकते. या लोकांच्या कुटुंबातील समस्या दूर होऊ शकतात. बुद्धीच्या जोरावर हे लोक स्वत:ची एक आगळी वेगळी ओळख निर्माण करेन. हेही वाचा : Navpancham Rajyog : १०० वर्षानंतर शुक्र आणि मंगळ करणार नवपंचम राजयोग; ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार, मिळणार अचानक धनलाभ शनि या राशीच्या आठव्या स्थानावर विराजमान असून या राशीच्या कुटुंबातील सर्व अडचणी दूर होतील. या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेन आणि कुटुंबात वडीलांचे सहकार्य मिळेन. करिअरसाठी हा काळ उत्तम राहीन आणि त्यांना बॉसचे सहकार्य मिळेन. या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहीन आणि पैसा कमावण्याचे स्त्रोत वाढतील. हेही वाचा : लक्ष्मीच्या कृपेने दिवाळीत ‘या’ राशींचे लोक होतील करोडपती! ३० वर्षांनंतर जुळून येणाऱ्या तीन राजयोगाने होईल भरभराट मिथुन राशीच्या नवव्या भावात मार्गी होऊन शनि या राशीसाठी नशीबवान ठरणार आहे. खूप काळापासून हे लोक अडकलेले कामे पूर्ण करतील आणि त्यांना समाजात मान सन्मान मिळणार. या लोकांना नशीबाची साथ मिळेल आणि सर्व क्षेत्रात यश मिळवतील. तसेच या लोकांना उच्च पद मिळेल. या लोकांची प्रगती होईल. या लोकांचे विदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात आणि या लोकांच्या जीवनात भरपूर समृद्धी नांदेल. (टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे) None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.