BUSINESS

वाई वाहतूक क्षेत्रात अदानी समूहाच्या विस्ताराला बळ; ‘एअर वर्क्स’ कंपनीच्या संपादनाची घोषणा

नवी दिल्ली : विमान देखभाल आणि दुरूस्ती सेवा क्षेत्रातील एअर वर्क्स ही कंपनी ४०० कोटी रुपयांच्या मोबदल्यात संपादित केली जाणार असल्याचे अदानी समूहाकडून सोमवारी अधिकृतपणे घोषित करण्यात आले. हेही वाचा >>> वर्षभरात शेअरचा भाव १६ रुपयांवरून १,७०२ रुपयांवर; कुशंकेतून ‘सेबी’कडून या कंपनीच्या शेअर्सच्या व्यवहारांवर बंदी अदानी समूहातील, अदानी डिफेन्स सिस्टीम्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेड (एडीएसटीएल) या कंपनीने एअर वर्क्समधील ८५.८ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी करार केला आहे. एअर वर्क्स ही विमान देखभाल व दुरूस्ती (एमआरओ) क्षेत्रातील देशातील सर्वांत मोठी कंपनी आहे. तिचा कार्यविस्तार ३५ शहरांमध्ये असून, एकूण मनुष्यबळ १,३०० इतका आहे. या व्यवहारामुळे अदानी समूहाच्या संरक्षण विमान देखभाल व दुरूस्ती क्षेत्रात क्षमतेत वाढ होणार आहे. देशातील हवाई संरक्षण परिसंस्थेत अदानी समूहाचे स्थान यातून भक्कम होणे अपेक्षित आहे. याचबरोबर देशातील नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात अदानी समूहाच्या नियोजित विस्ताराला या व्यवहारामुळे आणखी बळ मिळणार आहे. हेही वाचा >>> Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी शनिवार असूनही सुरू राहणार शेअर बाजार, ‘एनएसई’ने दिली मोठी अपडेट एअर वर्क्सकडून हवाई वाहतूक क्षेत्रात अनेक सेवा दिल्या जातात. त्यात दुरूस्ती, तपासणी, अंतर्गत रचना व फेरबदल, रंगकाम याचबरोबर मालमत्ता व्यवस्थापन या सेवांचा समावेश आहे. कंपनीकडून होसूर, मुंबई आणि कोची येथील सुविधांमध्ये विमानांची दुरूस्ती आणि देखभाल केली जाते. कंपनीने यासाठी वीसहून अधिक देशांतील हवाई वाहतूक नियामकांकडून आवश्यक परवानगी मिळविली आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.