BUSINESS

वर्षभरात शेअरचा भाव १६ रुपयांवरून १,७०२ रुपयांवर; कुशंकेतून ‘सेबी’कडून या कंपनीच्या शेअर्सच्या व्यवहारांवर बंदी

मुंबई: गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी निर्णायक पाऊल टाकताना, ‘सेबी’ने सोमवारी भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेडवर फसवणुकीचा गंभीर ठपका ठेवणाऱ्या निष्कर्षाचा अंतरिम आदेश जारी केला. कंपनीच्या शेअर्सच्या भावातील तीव्र वाढ पाहता नियामकांनी त्यातील व्यवहारांवर प्रतिबंध लागू केले आहेत. प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत सेबीकडून हा आदेश १६ डिसेंबर रोजी जारी करण्यात आला. भारत ग्लोबल डेव्हलपर्सचे समभाग मूल्य एका वर्षात १६.१४ रुपयांवरून, १,७०२.९५ रुपयांपर्यंत असे तब्बल १०५ पटीने वाढले आहे. हेही वाचा >>> Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी शनिवार असूनही सुरू राहणार शेअर बाजार, ‘एनएसई’ने दिली मोठी अपडेट सेबीने केलेल्या तपासणीत कंपनीकडून खोटी प्रगटने आणि कंपनीच्या आर्थिक आरोग्यमानाबाबत चुकीचे दावे करून समभागांच्या किमती फुगवत नेण्याची पद्धतशीर योजना राबवली गेल्याचे उघडकीस आले. उल्लेखनीय म्हणजे जून २०२० पर्यंत पाच प्रवर्तकांचा कंपनीच्या भागभांडवलात १६.७७ टक्के हिस्सा होता अर्थात त्यांच्याकडे ९३,८६० समभाग होते. तथापि, सप्टेंबर २०२० तिमाहीपासून, कंपनीने प्रवर्तकांचे भागभांडवल शून्य तर सार्वजनिक भागधारणा १०० टक्के असल्याचे नमूद केले आहे. हेही वाचा >>> Sensex Today: सोमवार ठरला ‘मंगल’वार! गुंतवणूकदारांमध्ये उत्साह; सेन्सेक्सची ८०० अंकांनी उसळी नवनव्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अस्तित्वात नसलेल्या व्यावसायिक कामगिरीचे खोटे चित्रण आणि नामांकित कंपन्यांसह भागीदारीचा बनाव निर्माण करण्यात आला. गुंतवणूकदारांची दिशाभूल करणाऱ्या पद्धतींच्या अवलंबाचा माजी प्रवर्तकांवर आरोप आहे. कृत्रिमरीत्या किंमत फुगवले गेलेले समभाग विकून या कथित प्रवर्तकांनी रग्गड नफा मिळवल्याचा ठपका आहे. तपास पूर्ण करून फसवणुकीत गुंतलेल्यांना जबाबदार धरण्याचा सेबीचा प्रयत्न असून, तोवर समभागांतील व्यवहार बंद ठेवण्याचे तिने आदेश दिले आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.