अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात विजय मल्ल्याच्या मालमत्ता विक्रीतून १४,१३१ कोटी रुपयांची वसुली केल्याचे संसदेत सांगितले. लगेचच मल्ल्याने आपल्याकडून कशी जास्तीची वसुली करण्यात आली, असे सांगण्याचा प्रयत्न केला आणि दिलासा मिळण्याचा आपल्याला हक्क असल्याचेही सांगितले. मात्र तत्पूर्वी त्याने केलेले गैरव्यवहार बघूया. विजय मल्ल्याचे वडील विठ्ठल मल्ल्या जे युनायटेड ब्रुअरीजचे मालक होते. १९६० च्या दशकात जेव्हा मुले गल्लीत गोट्या खेळत असत, तेव्हा विजय ‘रिमोट कंट्रोल’च्या गाड्या चालवायचा. मोठा झाल्यानंतर हीच आवड जीवनशैली बनली होती आणि २५० जुन्या गाड्यांचा त्यांचा संग्रह होता. वडिलांच्या निधनानंतर विजय मल्ल्यानेदेखील कठीण दिवस अनुभवले. जसे की, राज्या-राज्यांमधील दारूबंदी आणि सरकारची दारूच्या जाहिरातींवरची बंधने. मल्ल्याने त्यावरदेखील तोडगा काढला होता. सरोगसी म्हणजे एका वस्तूच्या आडून दुसऱ्या वस्तूची जाहिरात करणे. किंगफिशर सोडा आणि पाण्याच्या बाटल्यांद्वारे आपल्या मद्याची जाहिरात तो करायचा. हेही वाचा… माझा पोर्टफोलिओ : सुयोग्य बेअरिंगच्या शोधाला उत्तर चांगल्या चाललेल्या जीवनात वळण आले ते त्याच्या अति महत्त्वाकांक्षेमुळे. मुलाच्या १८व्या वाढदिवसाला भेट म्हणून ‘किंगफिशर एअरलाइन्स’ची स्थापना झाली. वर्ष २००५ मध्ये स्थापन झालेली हवाई वाहतूक कंपनी त्याचे स्वप्न होते. भारतातील एकमेव पंचतारांकित सेवा देणारी हवाई वाहतूक कंपनी त्याला बनवायची होती. त्यासाठी त्याने हजारो कोटी रुपये स्वतःच्या खिशातून आधी ओतले आणि मग बँकांना त्यात ओढले. मल्ल्याला आपली हवाई वाहतूक कंपनी सेवा भारताबाहेरसुद्धा घेऊन जायची होती. पाच वर्षे देशांतर्गत सेवा दिल्याशिवाय आंतरराष्ट्रीय सेवा देण्याची परवानगी नाही, हा त्या वेळी नियम होता. मग काय त्याने प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या एअर डेक्कनकडे आपले लक्ष वळवले आणि त्याने गोपीनाथ यांनी कंपनी ताब्यात घेतली. एअर डेक्कन स्वस्तात आणि कमीत कमी सुविधा देणारी विमान कंपनी होती. पण त्याच्या सेवेत बदल करण्यात आले आणि किंगफिशरसारखीच सुविधा देण्याचा प्रयत्न केला गेला. तेव्हाही तसे बरे चाललेले होते असे म्हणायला काही हरकत नाही, पण मग वर्ष २०११ मध्ये हिंडेनबर्गसारखाच एक अहवाल समोर आला, ज्याचे नाव होते ‘व्हेरिटास’. सप्टेंबर २०११ मध्ये आलेल्या ‘ए पाय इन द स्काय’ या अहवालाने बँकांमध्ये मात्र खळबळ माजवली आणि किंगफिशर एअरलाइनला अखेरची घरघर लागण्यास सुरुवात झाली. नवीन कर्जे देताना बँकांनी विचार करण्यास सुरुवात केली आणि तिकडे एअरलाइनला आपली देणी देण्यास उशीर होऊ लागला. परिणामी २० ऑक्टोबर २०१२ ला किंगफिशर एअरलाइन बंद पडली. यात कर्मचाऱ्यांचे सुमारे ६ महिन्यांचे वेतन थकवले गेले. हेही वाचा… बाजार रंग : सरत्या वर्षाचा बाजार अभ्यास कर्मचारी वेतनासाठी रस्त्यावर उतरले होते पण विजय मल्ल्याचे स्वतःच्या वाढदिवसाचे, फॉर्मुला वन आणि आयपीएलमधील विलासी खर्च डोळ्यात येत होते. कंपनीवर १७ बँकांचे मिळून ९,००० कोटींचे कर्ज होते आणि ‘सीबीआय’ने मल्ल्यावर खटलासुद्धा दाखल केला होता. नक्की एवढे पैसे गेले कुठे असा प्रश्न सर्वांना पडला होता. विजय मल्ल्या प्रत्येक वेळी तोडगा काढण्याची तयारी दर्शवत होता. पण बँका स्वीकारत नव्हत्या. बऱ्याच वादविवादानंतर अखेरीस मल्ल्या २ मार्च २०१६ ला लंडनला जाऊन पोहोचला. तेव्हापासून त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुमारे १४ हजार कोटींची वसुली, ज्याच्याकडून करण्यात आली तो नक्की राव की रंक असा प्रश्न सध्या पडला आहे. None
Popular Tags:
Share This Post:
होंडा, निस्सानचे ऐतिहासिक महाविलीनीकरण; ऑगस्ट २०२६ पर्यंत तडीस नेण्याचा निर्धार
December 23, 2024घरगुती बचतीचे वळण म्युच्युअल फंडांकडे, तरी ‘एफडीं’चा वरचष्मा कायम : स्टेट बँकेचा अहवाल
December 23, 2024What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 22, 2024
-
- December 22, 2024
-
- December 20, 2024
Featured News
‘फेड’सावधतेने विक्रीचा रेटा; ‘सेन्सेक्स’ ९६४ अंशांनी गर्भगळित
- By Sarkai Info
- December 20, 2024
‘शारंगधर’चे जयंत अभ्यंकर यांच्यासाठी आज श्रद्धांजली सभा
- By Sarkai Info
- December 19, 2024
Latest From This Week
‘पातकी वस्तूंवर ३५ टक्के दराने जीएसटी लादणे अविचारच’, स्वदेशी जागरण मंचाचा केंद्राला घरचा अहेर
BUSINESS
- by Sarkai Info
- December 18, 2024
प्रत्यक्ष कर संकलनातून केंद्राच्या तिजोरीत १५.८२ लाख कोटींचा महसूल
BUSINESS
- by Sarkai Info
- December 18, 2024
परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीने ‘सेन्सेक्स’ला पाच शतकी झळ
BUSINESS
- by Sarkai Info
- December 18, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.