Crime News : तांदूळ चोरल्याच्या संशयावरुन एका दलित माणसाला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. छत्तीसगड येथील रायगड जिल्ह्यात ही घटना रविवारी घडली आहे. सामाजिक कार्यकर्ते हे मॉब लिंचिंग असल्याचं म्हणत आहेत. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली आहे. तसंच भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रात्री २ वाजण्याच्या सुमारास छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील दुमारपल्ली गावात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या एका व्यक्तीला तांदूळ चोरल्याच्या संशयावरुन मारहाण करण्यात आली. सारथी अलियास बुटू असं मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याला अजय प्रधान आणि अशोक प्रधान या दोघांसह एकाने तांदूळ गोणी चोरल्याच्या संशयावरुन झाडाला बांधलं आणि त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर गावातल्या सरपंचांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहिलं की सारथी झाडाला बांधलेल्या अवस्थेत तसेच आहेत आणि बेशुद्ध झाले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सारथी यांना बांबूने तसंच लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. ज्यानंतर पोलिसांनी कलम १०३ (१) अंतर्गत तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का? याचा शोध पोलीस घेत आहेत. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. None
Popular Tags:
Share This Post:
Crime News : तांदूळ चोरल्याच्या संशयावरुन दलित माणसाला झाडाला बांधून मरेपर्यंत मारहाण, तिघांना अटक; कुठे घडली घटना?
December 24, 2024दीड वर्षात विक्रमी सरकारी नोकऱ्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती, ७१ हजारहून अधिक युवकांना नियुक्तीपत्र
December 24, 2024What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
Featured News
Latest From This Week
बिहार विधानसभा निवडणूक नितीशकुमार-मोदींच्या नेतृत्वातच; उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची माहिती
DESH-VIDESH
- by Sarkai Info
- December 23, 2024
“दिल्लीच्या निवडणुकीत आप जिंकली तरी केजरीवाल मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत”, काँग्रेसचा दावा; कारण सांगत म्हणाले…
DESH-VIDESH
- by Sarkai Info
- December 22, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.