DESH-VIDESH

No Detention Policy Scrapped : मोठी बातमी! इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी सरसकट उत्तीर्ण धोरण रद्द, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय

No Detention Policy Scrapped Update : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द केलं आहे. हे धोरण सुरुवातीला प्रचंड टीकेचा विषय ठरला होता. त्यामुळे आता अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी पुढच्या वर्गात जाऊ शकणार नाहीत. त्यांना दोन महिन्यांच्या आत परीक्षा देऊन पुढच्या वर्गात जाण्याची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण हक्क कायद्यात २०१९ च्या दुरुस्तीनंतर १६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांनी दोन वर्गांसाठी नो डिटेंशन पॉलिसी आधीच काढून टाकली होती. नवीन धोरणानुसार, जे विद्यार्थी नियमित परीक्षांनंतर पदोन्नतीचे निकष पूर्ण करू शकत नाहीत, त्यांना अतिरिक्त संधी दिली जाईल. निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांत पुनर्परीक्षा आयोजित केली जाईल. पास होण्याकरता ही एक संधी असेल. ????? ????????? ???????? ????????? ??? '?? ????????? ??????': Students in classes 5 and 8 who fail the annual exam can retake it within two months. If they fail again, they won't be promoted, but the school will not expel a… pic.twitter.com/AW4KRz8ch3 पुनर्परीक्षेनंतर एखादा विद्यार्थी पुन्हा अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात ठेवलं जाणार आहे. या काळात शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणार. तसंच, शिक्ष विद्यार्थ्यांच्या पालकांशीही समन्वय साधणार आहेत. या सुधारित पद्धतीचा उद्देश उत्तम शैक्षणिक कामिरी सुनिश्चित करणं आणि आवश्यक मानकांची पूर्तता करण्यासाठी धडपडत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आहे. हेही वाचा >> Success Story Of IAS Athar Khan: यूपीएससीमध्ये पटकावला दुसरा क्रमांक, आयएएस होऊन बनले कुटुंबातील पहिले सरकारी कर्मचारी; वाचा, अतहर खान यांची गोष्ट पुनर्परिक्षेत येणारे मूल पुन्हा पदोन्नतीचे निकष पूर्ण करण्यास अपयशी ठरल्यास, त्याला त्याच वर्गात ठेवण्यात येईल. यावेळी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक मार्गदर्शन करतील, असं अधिसूचनेत म्हटलं आहे. तसंच, सरकारने एक स्पष्टीकरण जारी केलं आहे की कणत्याही मुलाचं प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याला कोणत्याही शाळेतून काढून टाकले जाणार नाही None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.