DESH-VIDESH

Robbery in UP Bank : चोरानं समोर येऊन बंदूक रोखून धरली, तरी बँक कर्मचारी फोनवर निवांत बोलत होता! अखिलेश यादव यांची पोस्ट व्हायरल!

Robbery in UP Bank Viral Video : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोमवारी योगी सरकारवर कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार हल्ला चढवला आहे. अखिलेश यादव म्हणाले, उत्तर प्रदेश आता गुन्हेगारीसाठी नंबर वन झाला आहे. लखनौ आणि सहारनपुरच्या बँकांमध्ये चोरी आणि लुटमारीच्या घटनांचा संदर्भ देत त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय. उत्तर प्रदेशच्या राजधानीतील चिन्हाट भागातील जन सेवा केंद्र या लहान बँकेवर दिवसा-ढवळ्या दरोडा पडल्याचं या व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे. बँकेत दोन कर्मचारी कार्यरत होते. त्यापैकी एक कर्मचारी निवांतपणे फोनवर बोलण्यात गुंग होता. तेवढ्यात चार दरोडेखोर बँकेत शिरले. त्यांच्या तोंडावर चमास्क लावलेला होता. चौंघाच्याही हातात गावठी पिस्तुल होत्या. खिशातील पिस्तुल हातात काढेपर्यंत कर्मचारी फोनवरच निवांत बोलत होता. पिस्तुलाचा धाक दाखवल्याबरोबर दोन्ही कर्मचारी सावध झाले. तेवढ्यात एका कर्मचाऱ्याच्या हातून दरोडेखोरांनी फोन काढून घेतला. उप्र ‘इज ऑफ़ डूइंग क्राइम’ में हुआ न. 1 #सहारनपुर_बैंक_डकैती pic.twitter.com/YZzEoBB4QS u हेही वाचा >> Punjab Grenade Attacks : पंजाबमध्ये ग्रेनेड हल्ला करणारे तीन दहशतवादी एन्काउंटरमध्ये ठार; यूपी आणि पंजाब पोलि‍सांची संयुक्त कारवाई तर, दुसऱ्या कर्मचाऱ्याला तिजोरी रिकामी करण्याच्या सूचना दिल्या. कर्मचाऱ्यांनी तिजोरी न देण्याचा प्रयत्न केला. पण दरोडेखोरांच्या हातात पिस्तुल असल्याने अखेर त्यांना तिजोरी दरोडेखोरांच्या हाती द्यावी लागली. हा सर्व प्रकार बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जवळपास दीड लाख रुपयांचा दरोडा बँकेवर पडला आहे. हाच व्हिडिओ अखिलेश यादव यांनी शेअर केलाय. काही दिवसांपूर्वी लखनौमधील इंडियन ओव्हरसीज बँकेच्या चिन्हाट शाखेत सुमारे ३० लॉकर्स लुटले गेले होते. तसंच, अनेक वस्तूही गायब करण्यात आल्या होत्या. चोरट्यांनी बँकेच्या रिकाम्या जागेच्या भिंतीला छिद्र पाडून इमारतीमध्ये चोरी केल्याचा संशय बँक व्यवस्थापकाने व्यक्त केला आहे. यावेळीही चार दरोडेखोर आले होते. ३० लॉकरमधून त्यांनी जवळपास कोट्यवधि रुपयांची चोरी केली होती. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.