DESH-VIDESH

Crime News : “मावशी, बलात्कार म्हणजे काय?”, अल्पवयीन पीडितेने सामूहिक बलात्काराच्या दोन दिवस आधी विचारला होता प्रश्न

Crime News कोलकाता येथील डॉक्टरवर झालेल्या बलात्काराच्या (Crime News ) आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. ९ तारखेला ही घटना घडली. त्यानंतर १३ तारखेला महाराष्ट्रातल्या बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी उघड झाली. त्यानंतर या प्रकारच्या घटना समोर येतच आहेत. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना २२ तारखेला घडली होती. ही मुलगी ट्यूशनवरुन परतत असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. या घटनेचा स्थानिकांनी तीव्र निषेधही नोंदवला होता. आता या प्रकरणी बलात्कार पीडितेबाबत एक माहिती समोर आली आहे. २२ तारखेच्या संध्याकाळी अल्पवयीन मुलगी ट्यूशनवरुन घरी परतत असताना बलात्काराची ( Crime News ) घटना घडली. आसाम येथील नागाव जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले. या ठिकाणी असलेल्या विविध संघटना आणि नागरिकांनी आरोपींना अटक करण्याची मागणी करत बंद पुकारला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका १४ वर्षीय मुलीवर आसामच्या नागावमध्ये सामूहिक बलात्कार ( Crime News ) झाला. ही घटना गुरुवारी (२२ ऑगस्ट) संध्याकाळी घडली. ही मुलगी त्या भागातल्या नागरिकांना अर्धवट बेशुद्ध अवस्थेत सापडली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तिची वैद्यकिय चाचणी झाली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हे पण वाचा- Kolkata Rape Case : “सेमिनार हॉलमध्ये ती आधीच…” पॉलिग्राफ चाचणीत संजय रॉयने काय सांगितलं? आसाम येथील नागाव जिल्ह्यात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू झाला आहे. पोलीस कोठडीत असताना पळून जाण्याचा प्रयत्नात असताना त्याने तलावात उडी मारली, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं. आसाम येथील नागाव जिल्ह्यातील धिंग परिसरात एका १४ वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात तिघांची नावे समोर येत. यामध्ये तफाझुल इस्लाम (२४) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भारतीय सुरक्षा संहिता आणि POSCO कायद्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलीने दोन दिवसांपूर्वीच तिच्या मावशीला बलात्कार म्हणजे काय? हे विचारलं होतं. २० ऑगस्टला तिने हे विचारलं आणि २२ तारखेला तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. पीडिता ही तिच्या आई वडिलांजवळ नाही तर आजी आजोबांजवळ राहते. तिने तिच्या मावशीला बलात्कार म्हणजे काय हा प्रश्न विचारला होता. ज्यानंतर दोनच दिवसांनी ही घटना घडली. तसंच या घटनेनंतर तिची अवस्था फारच वाईट झाली आहे, असंही या मुलीच्या मावशीने सांगितलं. तिच्याबरोबर असं काहीतरी घडेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मला आता असं वाटतं आहे की तिची काळजी घ्यायला मीच कमी पडले. तिला पोलीस खात्यात जाऊन डीएसपी या पदापर्यंत पोहचायचं होतं. तिला भेटायला जेव्हा महिला पोलीस अधीक्षक आल्या होत्या तेव्हा त्यांच्याशी तिने किंचित हसून बोलण्याचा प्रयत्न केला. नागावमधील एका गावात या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला . ती त्यावेळी ट्यूशनवरुन घरी येत होती. ती बेशुद्धावस्थेत आढळून आली. ज्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडिता अनेकदा तिच्या मावशीसह रिक्षाने ट्युशनला जात असे. ज्यादिवशी ही घटना घडली तेव्हा ही मुलगी सायकलने ट्युशनला गेली हती. या मुलीच्या वडिलांनी सांगितलं की माझ्या मुलीला जेव्हा रुग्लायत पाहिलं तेव्हा तिला नीट बोलताही येत नव्हतं. इतकी तिची अवस्था वाईट झाली होती असं पीडितेच्या वडिलांनी सांगितलं. इंडिया टुडेने या बाबतचं वृत्त दिलं आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.