DESH-VIDESH

Rahul Gandhi : “…अन्यथा पुढचे पंतप्रधान जातीजनगणना करताना दिसतील”; राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका!

Rahul Gandhi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गां धी हे सातत्यानं देशात जातीजनगणना करण्याची मागणी करत आहेत. इंडिया आघाडीतील इतर पक्षांनीही या मागणीचं समर्थन केलं आहे. अशात त्यांनी आता एका सर्वेक्षणावरून पुन्हा जातीजनगणनेची मागणी अधोरेखित करत पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं आहे. यावरुन आता पुन्हा देशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच इंडिया टुडे ग्रुपने देशात जातीजनगणेसंदर्भात एक सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात बहुतांश नागरिकांनी देशात जातीजनगणना करण्याची मागणी केली होती. यावरून राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदी यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. हेही वाचा – Kiren Rijiju : “बालबुद्धी मनोरंजनासाठी चांगली आहे, पण…” राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावरून किरेन रिजिजूंची खोचक टीका! “पंतप्रधान मोदीजी, तुम्ही जर जातीजनगणना थांबवण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही स्वप्न पाहत आहात. आता कोणतीही शक्ती देशातील जातीजणगणना थांबवू शकत नाही. कारण भारतातील जनतेचा आदेश आला आहे, भारतातील ९० टक्के जनता लवकरच जातीजनगणनेला पाठिंबा देतील आणि मागणी करतील. त्यामुळे जनतेच्या या आदेशाची अंमलबजावणी करा, अन्यथा पुढचे पंतप्रधान हे करताना दिसतील”, असं ते म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे राहुल गांधी हे सातत्याने जातीजनगणनेचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. काल उत्तर प्रदेशातील एका सभेत बोलतानाही त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत जाती जनगणनेची मागणी केली होती. “जातीनिहाय जनगणनेमुळे केवळ लोकसंख्या किंवा कोणत्या जातीचे किती लोक आहेत एवढंच समजणार नाही, तर कोणाकडे देशाची किती संपत्ती व संसाधने आहेत? कोणत्या क्षेत्रात कोणाची भागिदारी आहे? हेदेखील समजू शकेल. भारतातील ९० टक्के लोक हे देशाच्या सिस्टिमचा भाग नाहीत. मी अलीकडेच मिस इंडिया झालेल्या महिलांची यादी पाहिली. मला वाटत होतं किमान यामध्ये तरी एखादी दलित तरुणी असेल. मात्र, ही यादी पाहून हिरमोड झाला. त्यात ना दलित तरुणी होती, ना आदिवासी, ना ओबीसी. मीडिया, चित्रपटसृष्टी आणि मिस इंडिया बनणाऱ्या तरुणींमध्ये देशातील ९० टक्के लोकांचं प्रतिनिधित्त्व नाही. देशाचं संविधान केवळ त्या उर्वरित १० टक्के लोकांनी नव्हे तर संपूर्ण १०० टक्के लोकांनी बनवलं आहे”., असे ते म्हणाले होते. हेही वाचा – Rahul Gandhi : “मिस इंडियाच्या यादीत एकही दलित-ओबीसी नाही, यावरून…”, राहुल गांधींचं वक्तव्य दरम्यान, राहुल गांधीच्या मागणीवरून भाजपानेही त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. “जातीजनगणनेचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. यांना आता मिस इंडिया स्पर्धा, चित्रपट आणि खेळातही आरक्षण हवं आहे. हा केवळ ‘बालबुद्धीचा’ मुद्दा नसून त्यांना समर्थन देणारे लोकही तेवढेच जबाबदार आहेत. अशी विधानं मनोरंजनासाठी चांगली आहेत. मात्र, त्यांनी आता देशातील मागावर्गीय जनतेची मस्करी करू नये”, असे ते म्हणाले. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.