DESH-VIDESH

Bangladesh Violence : बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला; दोन गटात तुफान राडा, ५० जण जखमी

Bangladesh Violence : बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देश सोडत भारतात आश्रय घेतला. बांगलादेशमधील राजकीय उलथापालथीनंतर नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झालं. यानंतर बांगलादेशमधील परिस्थिती नियंत्रणात येत असताना आणि जनजीवन पुन्हा रुळावर आल्याचं दिसत असतानाच हिंसाचाराची आग पुन्हा भडकल्याचं समोर आलं आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथे रविवारी रात्री विद्यार्थी आणि अन्सार गटाच्या सदस्यांमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ५० पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचं डेली स्टारच्या वृत्तानुसार इंडिया टुडेनी एका वृत्तात म्हटलं आहे. बांगलादेशची राजधानी ढाका शहरात रविवारी रात्री हिंसाचाराचा भडका उडाला. यांचं कारण म्हणजे नोकऱ्या कायम कराव्यात अशी मागणी करण्यात आली होती. हेही वाचा : Indian Origin Doctor Shot Dead: भारतीय वंशाच्या डॉक्टरची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या, रुग्णालयाकडून निवेदन जारी Clashes occurred between students and Ansar members near the Secretariat in the capital, leaving around 40 people from both sides injured on Sunday night. The clashes took place after 9pm, with both sides engaging in a series of chases. #Dhaka #Bangladesh #DhakaUniversity pic.twitter.com/NuquufuOYF दरम्यान, रविवारी रात्री ९.२० वाजताच्या सुमारास ढाका येथील सचिवालयाजवळ मोठ्या संख्येने विद्यार्थी जमले होते. त्यांना माहिती मिळाली होती की, अन्सार ग्रुपच्या सदस्यांनी सचिवालय ताब्यात घेतले होते. यामध्ये काही विद्यार्थीही आतमध्ये अडकले होते. ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समजताच शेकडो विद्यार्थ्यांनी सचिवालयाला घेराव घातला. यावेळी अन्सार गटाचे सदस्य आणि विद्यार्थी अशा दोन्ही गटामध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत जवळपास दोन्ही गटाचे ५० पेक्षा जास्त जण जखमी झाले. दरम्यान, सध्या अन्सार ग्रुपच्या सदस्यांनी गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरु केलं असून त्यांच्या नोकऱ्या कायम करण्यात याव्यात, अशी त्यांची मागणी आहे. तर अन्सार ग्रुपच्या विरोधात विद्यार्थ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.