DESH-VIDESH

Animal Cruelty on Dog: विकृत नराधमाचा कुत्र्यावर बलात्कार, व्हायरल व्हिडीओनंतर आरोपीला अटक

Viral Video Rape on Female Dog: देशभरात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या बातम्यांनी मन खिन्न झालेले असतानाच उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक आणि किळस आणणारी घटना घडली आहे. माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य याठिकाणी घडले आहे. एका माथेफिरू नराधमाने श्वानावर लैगिंक अत्याचार केले आहेत. या अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सदर विकृत आरोपीला अटक करण्याची मागणी होऊ लागली. त्यानंतर पोलिसांनी आता या नराधमाला अटक केली आहे. पीपल्स फॉर ॲनिमल्स (PFA) ने यासंबंधी आवाज उचलला होता. गाझियाबादच्या मोदीनगर भागात ही किळसवाणी घटना घडली. पीएफएच्या सदस्या सुरभी रावत यांनी या घटनेचा व्हिडीओ एक्सवर टाकून या नराधमाला तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली होती. रावत आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, हा नराधम मादी श्वानावर वारंवार लैंगिक अत्याचार करत आहे. सदर पाशवी कृत्य संतापजनक असून प्राण्यावरील क्रूरता रोखण्यासाठी यावर अधिक कठोर कारवाई झाली पाहीजे. या पाशवी कृत्याबाबत आरोपीला कडक शासन करण्याची मागणी त्यांनी केली. हे वाचा >> प्राणीशास्त्रज्ञ ॲडम ब्रिटन यांचा श्वानावर बलात्कार, ४० श्वानांची हत्या; आता मिळाली २४९ वर्षांची शिक्षा या पोस्टमध्ये सुरभी रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक्स अकाऊंटलाही टॅग केले आहे. त्याशिवाय गाझियाबादच्या पोलीस ठाण्याच्या अकाऊंटलाही टॅग करण्यात आले आहे. प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्या या नराधमांविरोधात जर समाजाने एकत्रित येऊन आवाज उठवला नाही तर हे नराधम लहान मुले आणि महिलांनाही लक्ष्य करतील. या घृणास्पद कृत्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. सदर घटनेचा किळसवाणा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सामान्य लोकांनीही आपला संताप व्यक्त केला. अनेक एक्स युजर्सनी पोलिसांनी कारवाई करावी, यासाठी दबाव आणला. तर काही जणांनी या विकृत व्यक्तीला ठेचून काढावे, अशी मागणी केली. मुक्या प्राण्यावर अशाप्रकारे अत्याचार करणाऱ्या आरोपीला समाजात मोकळे सोडता कामा नये, अशी उद्विग्न प्रतिक्रिया काही युजर्सनी व्यक्त केली. व्हायरल व्हिडीओनंतर मोदीनगर पोलिसांनी सदर आरोपीला शोधून अटक केली. प्राण्यावरील क्रूरता कायद्याच्या अनुषंगाने त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पुढील तपास पोलीस करत आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.