DESH-VIDESH

Air India Express : एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याची धमकी, अयोध्येत आपत्कालीन लँन्डिंग!

Air India Express Bomb Threat : एअर इंडिया एक्स्प्रेस विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशातील महर्षि वाल्मिकी विमानतळावर आप्तकालीन लँन्डिंग करण्यात आलं आहे. या विमानाने दुपारी १२.२५ वाजता जयपूर येथून उड्डाण केले होते. परंतु, धमकी मिळताच अयोध्येतील महर्षि वाल्मिकी विमानतळावर उतरवण्यात आलं. विमानतळ व्यवस्थापक विनोद कुमार म्हणाले, “बॉम्ब ठेवल्याची धमकी प्राप्त झाल्याने एअर इंडिया एक्स्प्रेसने अयोध्येत आपत्कालीन लँन्डिंग केली.” हे विमान जयपूर येथून १२.२५ मिनिटांनी निघालं. तर, १.५९ मिनिटांनी उत्तर प्रदेशातील महर्षि वाल्मिकी विमानतळावर उतरवण्यात आलं. बोईंग ७३७ Max 8 एअरक्राफ्ट हे विमान आहे. हेही वाचा >> Air India Flight: मुंबईहून निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी; तातडीचा उपाय म्हणून विमान थेट दिल्लीच्या दिशेनं वळवलं! एका सोशल मिडिया खात्यावरून एअर इंडिया एक्स्प्रेस विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात आल्या. अयोध्येत विमानाचं सुरक्षित लँन्डिंग करण्यात आल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली, अशी माहिती एअर इंडिया एक्स्प्रेसचे प्रवक्त्यांनी दिली. हे विमान आता अयोध्या विमानतळावर वापरात नसलेल्या मोकळ्या जागी उभं करण्यात आलं आहे. बाम्ब शोधक पथकाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. #WATCH | “Air India Express, along with a few other operators, received a specific security threat from an unverified social media handle. In response, security protocols were promptly activated as directed by the Government-appointed Bomb Threat Assessment Committee. The flight… pic.twitter.com/ETTU5tRh1r काही दिवसांपूर्व एअर इंडिया विमानातही अशीच धमकी मिळाली होती. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून न्यूयॉर्कमधील जेएफके आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेनं एअर इंडियाच्या AI 119 या प्रवासी विमानानं उड्डाण घेतलं. सोमवारी भल्या पहाटे म्हणजेच २ वाजताच्या सुमारास विमान हवेत झेपावलं. पण काही वेळातच हे विमान नियोजित मार्गावरून दिल्लीच्या दिशेनं वळवण्यात आलं. विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेनं निघाल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली. त्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये प्रचंड संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. हे विमान सध्या दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आलं आहे. तिथे सगळ्यात आधी विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवण्यात आलं. यानंतर विमानाची पूर्ण तपासणी करण्याचं काम सुरू करण्यात आलं. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.