DESH-VIDESH

New Lady of Justice Statue : भारतात आता ‘अंधा कानून’ नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवली; तलवारीऐवजी… नव्या मूर्तीत काय आहे खास?

New Lady of Justice Statue In Supreme Court says Law Is Not Blind anymore : बऱ्याचदा आपण चित्रपटांमधील न्यायालयातील प्रसंगांमध्ये न्यायदेवतेचा (Lady of Justice) पुतळा पाहिला आहे. यामध्ये न्यायदेवतेच्या एका हातात तलवार, तर दुसऱ्या हातात तराजू दिसतो. तसेच या न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आपण पाहिली आहे. मात्र, आता न्यायालयांमध्ये न्यायदेवतेचा नवा पुतळा पाहायला मिळू शकतो. कारण, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांसाठीच्या ग्रंथालयातील न्यायदेवतेचा पुतळा (New Lady of Justice) बदलण्यात आला आहे. या पुतळ्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यापैकी प्रमुख बदल म्हणजे न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवण्यात आली आहे. तसेच तिच्या एका हातात तराजू तर दुसऱ्या हतात तलवारीऐवजी भारतीय संविधान दिसत आहे. ऑल इंडिया रेडिओ न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवून न्यायदेवता अंध नाही/कायदा अंध नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच कायदा व्यवस्था भारतीय संविधानावर आधारित असल्याचं नमूद करण्यासाठी न्यायदेवतेच्या हातातील तलवारीची जागा आता भारतीय संविधानाने घेतली आहे. हे ही वाचा >> Indian Airlines : तीन दिवसांत १२ विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी; केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणाले, “विघ्नकारी कृत्यांमुळे चिंता” आधी न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी होती. ही पट्टी म्हणजे समानतेचं प्रतीक मानलं जात होती. याचाच अर्थ न्यायालयासमोर सर्वजण सारखेच आहेत. नेता, सेलिब्रेटी, श्रीमंत, गरीब असा भेदभाव न्यायदेवता करत नाही. तर हातातील तलवार ही गुन्हेगारांना शिक्षा देण्याची शक्ती दर्शवते. Lady Justice in SC library now holds a Constitution with open eyes ⚖️In an initiative shedding the colonial imprint and traditional attributes, the statue of Lady Justice, in the judges' library of the Supreme Court, now holds a copy of the Indian Constitution, instead of a… pic.twitter.com/ocgXfmai70 हे ही वाचा >> Kamala Harris : “गांजामुळे कुणालाही शिक्षा होता कामा नये”, कमला हॅरीस यांचं गांजा कायदेशीर करण्याचं आश्वासन! एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयातील ग्रंथालयात नवी मूर्ती ठेवण्यात आली आहे. भारताने अलीकडेच ब्रिटीशकालीन इंडियन पीलन कोड कायद्यांमध्ये बदल करून भारतीय न्याय संहिता कायदा लागू केला आहे. न्यायदेवतेच्या मूर्तीमधील बदल हा त्याचाच एक भाग मानला जात आहे. भारतातील न्यायदेवतेच्या जुन्या मूर्तीची प्रेरणा ग्रीक संस्कृतीतून घेण्यात आली आहे. तिथल्या संस्कृतीत थेमिस ही न्यायाची देवता आहे. तिच्या एका हातात तराजू तर, दुसऱ्या हातात तलवार आहे. अनेक न्यायालयांमध्ये भारतीय व ग्रीक तत्त्वज्ञानानाचं मिश्रण करून तयार केलेली न्यायदेवतेची मूर्ती पाहायला मिळते. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.