DESH-VIDESH

चीनच्या प्रकल्पांचेच पाककडून गोडवे; ‘वन बेल्ट वन रोड’बाबत संकुचित दृष्टी नको, शरीफ यांच्याकडून आगपाखड

पीटीआय, इस्लामाबाद पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीत चीनच्या ‘वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह’ प्रकल्पाचे समर्थन केले. अशा प्रकल्पांकडे संकुचित मनाने पाहू नये, असे आवाहन पाकिस्तानने सदस्य देशांना केले. भारताने या प्रकल्पाला विरोध केला आहे. ‘एससीओ’च्या उद्घाटनपर शिखर परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले, ‘चीनचे ‘वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह’ आणि ‘चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग’ यांची व्याप्ती वाढायला हवी. या प्रकल्पांकडे संकुचित मनाने पाहायला नको. सामूहिक क्षमतेने यात सर्वांनी उतरायला हवे. प्रादेशिक विभागात आर्थिक एकीकरणाच्या उद्दिष्टाला त्यामुळे चालना मिळेल.’ हेही वाचा >>> New Lady of Justice Statue : भारतात आता ‘अंधा कानून’ नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवली; तलवारीऐवजी… नव्या मूर्तीत काय आहे खास? इस्रायलच्या गाझा पट्टीतील हल्ल्याचा शरीफ यांनी या वेळी निषेध केला. ते म्हणाले, ‘गाझामध्ये चाललेल्या संहाराकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाने यासाठी पुढाकार घेऊन युद्धविराम घडवायला हवा. १९६७ पूर्वीच्या सीमांवर आधारित पॅलेस्टाइन देशाची निर्मिती करावी.’ ‘एससीओ’मध्ये चीन, भारत, रशिया, पाकिस्तान, इराण, कझाकस्तान, किरगिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि बेलारूस या देशांचा समावेश आहे. १६ देश निरीक्षक म्हणून आहेत. हेही वाचा >>> Indian Airlines : तीन दिवसांत १२ विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी; केंद्रीय नागरी उ चीन आणि रशियाने प्रादेशिक सहकार्य, आर्थिक एकीकरणावर आपापल्या भूमिका मांडताना जोर दिला. तसेच, दहशतवादाविरोधात ‘एससीओ’च्या चौकटीत सदस्य देशांच्या दृढ भागीदारीसाठी आवाहन केले. चीनचे पंतप्रधान ली कछियांग आणि रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुत्सिन यांनी चांगल्या दळणवळणासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाची गरज अधोरेखित केली. तसेच, तंत्रज्ञान, डिजिटल व्यापार आणि हवामान बदल क्षेत्रामध्ये सहकार्याच्या नव्या संधी शोधण्याची गरज व्यक्त केली. ‘एससीओ’ची पुढील बैठक २०२५ मध्ये रशियामध्ये होणार आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.