MAHARASHTRA

भंडारदरा निळवंडे धरणातून सुरू असणाऱ्या विसर्गात वाढ

अकोले भंडारदरा निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असून धरणात होणारी पाण्याची आवक वाढली आहे.त्या मुळे निळवंडे धरणातून सुरू असणारा विसर्ग वाढवून १९ हजार ७०५ क्यूसेक करण्यात आला आहे. प्रवरा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ सुरू झाली आहे.मुळा धरणातून दहा हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. मुळा,भंडारदरा आणि निळवंडे या जिल्ह्यातील तीनही मोठया धरणांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साठा झालेला आहे. या धरणांचे पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे.त्या मुळे सर्वच धरणांमधून धरणातील पाणी पातळी नियंत्रणासाठी नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. हेही वाचा >>> Rahul Gandhi Sangli Visit : राहुल गांधी ५ रोजी सांगली दौऱ्यावर; पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण भंडारदरा पणलोटात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळे,तसेच धरणात होणारी पाण्याची आवक कमी झाल्यामुळे भंडारदरा धरणाचा विसर्ग आज सकाळी ७ हजार ८५१ क्यूसेक पर्यंत कमी करण्यात आला होता.तसेच निळवंडे धरणाचा विसर्ग कमी करून सकाळी तो ११ हजार २१८ क्यूसेक झाला होता.प्रवरा नदीचे पाणी त्या मुळे उतरू लागले होते.मात्र आज सकाळपासून घाटघर रतनवाडी परिसरात पुन्हा मुसळधार पावसास सुरवात झाली.त्या मुळे आधी भंडारदरा व नंतर निळवंडे च्या विसर्गात वाढ करण्यात आली.सकाळी ११ हजार २१८ क्यूसेक असणारा निळवंडे विसर्ग दुपारी दोन वाजता १२ हजार ८४ क्यूसेक तर सायंकाळी तो २० हजार ३६ क्यूसेक झाला होता.यातील ३३० क्यूसेक पाणी कालव्यात सोडले असून १९ हजार ७०५ क्यूसेक पाणी प्रवरा नदीत पडत आहे. आढळा नदीच्या सांडव्यावरून सायंकाळी १ हजार ४३९ क्यूसेक पाणी नदी पात्रता पडत होते. काल पंधरा हजार क्यूसेक असणारा मुळा नदीचा विसर्ग आज दहा हजार क्यूसेक करण्यात आला आहे.सायंकाळी २६ हजार दळघफु क्षमतेच्या मुळा धरणाचा पाणी साठा २४ हजार ६४५ दलघफु होता.सध्या या धरणात १० हजार ७३८ क्यूसेक ने पाण्याची आवक सुरू आहे. आज सकाळ पर्यंतच्या चोवीस तासात भंडारदरा पाणलोटात पडलेला पाऊस मिमी मध्ये पुढील प्रमाणे भंडारदरा ७०,घाटघर १५२, रतनवाडी १६० व पांजरे ४५ सततच्या पावसामुळे तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील जनजीवन विस्कळीत झाले असुन संपूर्ण परिसर गारठून गेला आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.