MARATHI

Maharashtra Breaking News LIVE: 'शिवरायांचा असा अपमान मुघलांनाही केला नाही'; राऊत संतापले

Maharashtra Breaking News LIVE: आज राज्यभरामध्ये दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. मुंबईसहीत महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये दहीहंडी साजरी केली जात आहे. याचसंदर्भातील सर्व घडामोडींबरोबर महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घ्या एकाच ठिकाणी Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स 27 Aug 2024, 09:55 वाजता शिवरायांचा सिंधुदुर्गमधील पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरुन बोलताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी, "1933 मधील टिळकांचा पुतळा अजूनही शाबूत नेहरुंनी शिवरायांचा बनवलेला पुतळाही सुस्थितीत आहे," असं सांगितलं. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घेतला पाहिजे, असंही राऊत म्हणाले. 27 Aug 2024, 09:51 वाजता सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्याच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. शिवरायांचा असा अपमान मुघलांनाही केला नाही, असं म्हणत राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. शिंदेंच्या मर्जीजल्या ठेकेदारांना काम देण्यात आल्याचंही राऊत म्हणाले. ठेकेदार, शिल्पकार सगळेच ठाण्याचे आहेत, असंही राऊत म्हणाले. सरकारच्या चेहऱ्यावर एकही वेदना मला दिसत नाही. समुद्रावर वारा असणारच, वाऱ्याची कारणं कसली देता? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे. मर्जीतल्या ठेकेदारांना कंत्राट देऊन घाईघाईत मोदींच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं, असा आरोप राऊतांनी केला आहे. 27 Aug 2024, 09:35 वाजता कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणामध्ये पाण्याची आवक देखील वाढली आहे. त्यामुळे आज सकाळी 11:00 वाजल्या पासून कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू करून 2100 क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सध्या धरणात 98.89 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. 27 Aug 2024, 08:12 वाजता सिंधुदुर्गमधील किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेप्रकरणी मालवण पोलीस स्टेशनमध्ये दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेसर्स आर्टिस्टरी कंपनीचे मालक जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सलटंट चेतन पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक इंजिनिअरने ही तक्रार दाखल केली आहे. कलम 109।110, 125, 318 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 Aug 2024, 08:09 वाजता सणासुदीचे दिवस, तसेच देशात विमानांची घटलेली संख्या आणि वाढत्या प्रवासी संख्येमुळे विमान तिकिटांचे दर गगनास भिडण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीला अजून वेळ असला तरी आताच देशातील विविध पर्यटनस्थळांच्या विमान तिकिटांच्या दरात किमान 15 ते कमाल 30 टक्के वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. 27 Aug 2024, 08:06 वाजता आज दहीहंडीच्या दिवशीही मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे आता गोविंदांना दहीहंडीचा थरार भरपावसात भिजत दाखवावा लागणार. 27 Aug 2024, 08:03 वाजता पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव-कांदिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे 35 दिवसांचा मोठा वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे. 27-28 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 5-6 ऑक्टोबरपर्यंत हा ब्लॉक सुरू राहील. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रवाशांना काही प्रमाणात विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाला सामोरे जावे लागणार आहे. 27 Aug 2024, 08:01 वाजता खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर सकाळी 11 वाजता नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह आदी काँग्रेस नेते उपस्थित असणार आहेत. 27 Aug 2024, 07:59 वाजता मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आज सकाळी 9 वाजता सतेज पाटील या ठिकाणी पहाणी करण्यासाठी पोहचत आहेत. 27 Aug 2024, 07:58 वाजता सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळल्यानंतर आज नौदल अधिकारी राजकोट किल्ल्याची पाहणी करणार आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.