MARATHI

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on AUGUST 27 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर. 27 Aug 2024, 08:54 वाजता Solapur : सोलापुरातील बार्शीमध्ये 2 वृद्धांनी एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.. चॉकलेट, पैशाचं अमिष दाखवून या दोन्ही वृद्धांनी या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला... पीडितेच्या आईला हा सर्व प्रकार लक्षात येताच दोन्ही वृद्धांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केलीय... बातमीचा व्हिडीओ पाहा - 27 Aug 2024, 08:38 वाजता Sanjay Raut : मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर खासदार संजय राऊत आक्रमक झालेत. रवींद्र चव्हाणांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केलीय. श्रेय घेण्याच्या घाईमुळे हे घडल्याचा आहोप राऊतांनी 'एक्स' या सोशल मीडियाच्या हँडलवरून केलाय. बातमीचा व्हिडीओ पाहा - 27 Aug 2024, 08:26 वाजता Nagpur RSS : आगामी विधानसभेत संघाचा सक्रिय सहभाग असणार आहे.. त्यासाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विधानसभा मतदारसंघ नियाह समन्वयक नेमाण्यास सुरूवात करण्यात आल्याची मोठी माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिली...नागपुरात काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विदर्भ प्रांताच्या संघ पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्याबैठकीत याबाबतचं प्राथमिक नियोजन करण्यात आलं असल्याची माहिती आहे. लोकसभे प्रमाणं विधानसभेत भाजपला फटका बसू नये यासाठी संघ दक्ष झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय....विधानसभेच्या समन्वयकांमध्ये पूर्णकालीक प्रचारक, विस्तारक तसेच वरिष्ठ स्वयं सेवकाचा समावेश असणार आहे.. बातमीचा व्हिडीओ पाहा - 27 Aug 2024, 08:24 वाजता Dahihandi Utsav : राज्यभरात आज दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.. त्यासाठी गोविंदा पथकांनी खास तयार केलीय.. उंचच्या उंच थर लावण्यासाठी गोविंदा पथक सज्ज झालीय.. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात गोविंदा पथक दहीहंडी उंचच्या उंच थर लावून दहीहंडी फोडणार आहेत.. राजकीय पक्षांकडून उंच थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय...काही राजकीय पक्षांनी दहीहंडी उत्सवासाठी जोरदार तयारी केलीय.. त्यामुळे गोविंदा पथकांसह राजकीय नेतेही सज्ज झालेत.. बातमीचा व्हिडीओ पाहा - None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.