MANORANJAN

Video : “रुपेरी वाळूत माडांच्या बनात…”, पारू अन् आदित्यचा जबरदस्त डान्स! दोघांच्या मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष

Paaru Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ‘गोविंदा आला रे’ या कार्यक्रमाचं खास आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकप्रिय मालिकेतील कलाकार विविध गाण्यांवर थिरकताना दिसले. ‘झी मराठी’च्या ‘पारू’ मालिकेने देखील अल्पावधीतच प्रेक्षकांनी पसंती मिळवली आहे. यामधल्या पारू अन् आदित्यच्या ऑनस्क्रीन जोडीने एकत्र डान्स करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. झी मराठीच्या ‘पारू’ ( Paaru ) मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे ‘पारू’ ही मुख्य भूमिका साकारत आहे. तर, अभिनेता प्रसाद जवादे या मालिकेत आदित्य किर्लोस्कर हे पात्र साकारत आहे. या मालिकेत नेहमीच विविध ट्विस्ट येत असतात. परंतु, जन्माष्टमीचा हा सण साजरा करण्यासाठी हे सगळे कलाकार शूटिंगमधून वेळ काढत एकत्र जमले आहेत. यावेळी पारू आणि आदित्यने जुन्या मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळालं आहे. हेही वाचा : Bigg Boss Marathi : पहिल्याच आठवड्यात बेघर झालेल्या पुरुषोत्तमदादा पाटलांना भेटण्यासाठी जपानी चाहत्याने थेट गाठली आळंदी, पाहा व्हिडीओ पारूने ( Paaru ) जांभळ्या रंगाची नऊवारी साडी, त्यावर मॅचिंग बांगड्या, त्यावर शोभेल असा ब्लाऊज, नाकात नथ, केसात गजरा, गळ्यात मोत्याचे दागिने असा मराठमोळा लूक केला होता. तर, आदित्यने सुद्धा पारूच्या साडीला मॅचिंग होईल असा गुलाबी रंगाचा कुर्ता आणि त्यावर जांभळ्या रंगाचं जॅकेट घातलं होतं. पारू-आदित्यच्या या लूकचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. दोघेही या पारंपरिक लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत. हेही वाचा : Video : ‘शुभविवाह’ मालिकेतील कलाकारांचा मजेशीर व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर, म्हणाले, “आता आप्पाचा जीव घेता का?” A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial) नेटकऱ्यांनी देखील पारू-आदित्यच्या या लूकचं आणि जबरदस्त डान्सचं भरभरून कौतुक केलं आहे. या दोघांनीही “रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना…” या आशा भोसले यांच्या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला आहे. “दोघांचीही केमिस्ट्री सुंदर आहे”, “प्रसादचा डान्स”, “पारू आणि आदित्य बेस्ट”, “मस्त डान्स” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. हेही वाचा : Bigg Boss Marathi : “रितेशला ठरवून कुणाचा अपमान करता येत नाही”, लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट; म्हणाली, “त्याच्या डोळ्यात…” दरम्यान, ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ ( Paaru ) मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे, प्रसाद जवादे, मुग्धा कर्णिक, परि तेलंग, पूर्वा शिंदे, यांच्या प्रमुख भूमिका आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.