MANORANJAN

बॉलीवूड अभिनेत्रीने ब्रिटिश अभिनेत्याशी केलं लग्न, पहिल्या रिलेशनशिपमधून आहे पाच वर्षांचा मुलगा

Amy Jackson Married to Ed Westwick wedding photos: ‘सिंग इज ब्लिंग’ फेम अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सनने ब्रिटिश अभिनेता आणि संगीतकार एडवर्ड जॅक पीटर वेस्टविकशी लग्न केलं आहे. इटलीतील अमाल्फी बीचवर या दोघांचे डेस्टिनेशन वेडिंग पार पडले. या लग्नात अ‍ॅमीचा पाच वर्षांचा मुलगा अँड्रियासही सहभागी झाला होता. दोघांनी ख्रिश्चन पद्धतीनुसार लग्न केले. अ‍ॅमी आणि एडवर्डने लग्नाचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. लग्नात अ‍ॅमी जॅक्सन आणि एडवर्ड वेस्टविक दोघेही खूप सुंदर दिसत होते. लग्नासाठी अ‍ॅमीने पांढरा गाउन ड्रेस निवडला तर एडवर्डने काळ्या पँटसह पांढरा सूट घातला होता. पहिल्या फोटोत एडवर्डने अ‍ॅमीला जवळ पकडून पोझ दिली आहे, तर दुसऱ्या फोटोत ते दोघेही कॅमेऱ्याकडे बघत पोझ देत आहेत. “प्रवास आता सुरू झाला आहे”, असं कॅप्शन देत एडवर्डने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. A post shared by Ed Westwick (@edwestwick) अ‍ॅमी जॅक्सन आणि एडवर्ड वेस्टविक या दोघांनाही चाहते नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहे. अ‍ॅमीच्या लग्नात रोहिणी अय्यर सहभागी झाली होती. अ‍ॅमी जॅक्सन आणि एडवर्ड वेस्टविकने या वर्षी जानेवारीमध्ये एंगेजमेंट केली होती. त्यांनतर दोघांनी लंडनमध्ये एंगेजमेंट डिनर पार्टी आयोजित केली होती आणि जवळच्या मित्रांबरोबर त्यांच्या सेलिब्रेशन केले होते. त्यानंतर दोघेही आता इटलीत विवाहबंधनात अडकले. एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता ३२ वर्षीय अ‍ॅमी जॅक्सनचं हे पहिलंच लग्न आहे, पण तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. एडवर्ड वेस्टविकशी लग्न करण्यापूर्वी अ‍ॅमी (Amy Jackson Ex Boyfriend) बिझनेसमन जॉर्ज पानायियोटोसह रिलेशनशिपमध्ये होती. जानेवारी २०१९ मध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर अ‍ॅमीने मुलाला जन्म दिला. अँड्रियास जॅक असं त्याचं नाव आहे. जॉर्ज आणि अ‍ॅमी यांच्यात सतत मतभेद व्हायचे, त्यामुळे दोघांचे लग्न होण्याआधीच ब्रेकअप झाले. अ‍ॅमी एकटीच मुलाचा सांभाळ करते. अशातच अ‍ॅमीने एडवर्ड वेस्टविकला डेट करायला सुरुवात केली. २०२२ पासून हे दोघेही एकत्र आहेत, असं म्हटलं जातं. प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न, कूर्गमध्ये अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर अ‍ॅमी जॅक्सन (Amy Jackson Movies) ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने बॉलीवूड चित्रपटांबरोबरच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. २०१२ मध्ये ‘एक दिवाना था’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर तिच्याबरोबर मुख्य भूमिकेत होता. ‘येवाडू’, ‘ऑपरेशन फॉर्च्युन’, ‘थेरी’, ‘थंगमगन’, ‘मद्रासापट्टणम’, ‘देवी’, ‘गेथू’ हे तिचे काही गाजलेले चित्रपट आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.