MANORANJAN

Kangana Ranaut : “..तर कंगना रणौत यांचा शिरच्छेद करु”, धमकीचा व्हिडीओ मेसेज आल्याने खळबळ

Kangana Ranaut : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार कंगना रणौत यांना ठार करु अशी धमकी देण्यात आली आहे. इमर्जन्सी हा कंगना यांचा सिनेमा पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर कंगना रणौत ( Kangana Ranaut ) यांना जिवे मारण्याची धमकी आली आहे. एका व्हिडीओ मेसेजद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. कंगना रणौत ( Kangana Ranaut ) या अभिनेत्री आहेत तसंच त्या मंडीमधून भाजपाच्या खासदारही झाल्या आहेत. एक व्हिडीओ मेसेज आला आहे ज्यामध्ये अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत ( Kangana Ranaut ) यांना धमकी दिली जाते आहे. एक ग्रुप आहे, या ग्रुपने कंगना यांना चपलेने मारण्याची आणि जिवे मारण्याची धमकी दिली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ शिख समुदायाचा आहे. या व्हिडीओत अशी धमकी देण्यात आली आहे की कंगना रणौत ( Kangana Ranaut ) यांनी जर इमर्जन्सी सिनेमा प्रदर्शित केला तर सगळे शिख बांधव तुम्हाला जोड्याने मारतील. तुम्ही आधी थोबाडीत खाल्लीच आहे पण आता चप्पल खावी लागणार आहे. मला खात्री आहे मी एक शिख आहे, प्राउड मराठी आहे. मला माहीत आहे की एक शिख, मराठी, ख्रिश्चन आणि प्रत्येक हिंदू तुम्हाला चपलेने मारेल. आम्ही स्वतःचं शीर कापू शकतं तर कुणाचं शीर धडावेगळं करु शकतो. अशी धमकी देणारा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे पण वाचा- Kangana Ranaut BJP: “कंगना रणौत यांना पक्षाच्या धोरणावर बोलण्याचा अधिकार नाही”, भाजपानं केलं स्पष्ट; ‘ते’ विधान भोवलं! इंदिरा गांधींच्या आयुष्यावर आधारित असलेला इमर्जन्सी हा सिनेमा आहे. कंगना रणौत ( Kangana Ranaut ) यांच्या या सिनेमात आणीबाणीचा काळ, इंदिरा गांधी यांची हत्या या सगळ्या घटनांचा समावेश आहे. हा सिनेमा प्रचारकी आहे म्हणजेच प्रपोगंडा आहे असा आरोप शिख कौन्सिलनी केला आहे. या सिनेमात ऐतिहासिक घटना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत असाही आरोप करण्यात आला आहे. सिनेमा प्रदर्शित झाला तर शहीदांचा अपमान होईल, शिख समुदायाचे नेते जरनैल सिंह खालसा भिंडरावाले यांची भूमिका नकारात्मक दाखवण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करत आहोत असं या कौन्सिलने म्हटलं आहे. कंगना यांचा सिनेमा इमर्जन्सी इंदिरा गांधींच्या काळात लागलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. सिनेमा ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात इंदिरा गांधींची भूमिका कंगना यांनीच केली आहे, तसंच सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.