MANORANJAN

Bigg Boss Marathi : इरिना झाली Eliminate! अरबाज-वैभवला अश्रू अनावर; सल्ला देत म्हणाली, “तुम्ही सगळे…”

Bigg Boss Marathi Irina Rudakova Elimination : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या आठवड्याचा भाऊचा धक्का नुकताच पार पाडला. यावेळी रितेश देशमुखने घरात गैरवर्तन करणाऱ्या सगळ्या सदस्यांची शाळा घेतली. शनिवारी भाऊचा धक्का सुरू होताच रितेशने जान्हवीची जबरदस्त शाळा घेतली. घरात केलेली चुकीची वक्तव्य, पॅडीचा अपमान या सगळ्या गोष्टींसाठी रितेशने तिला जाब विचारला. एवढंच नव्हे, तर जान्हवीला आठवडाभर जेलमध्ये राहण्याची शिक्षा देण्यात आली आहे. जान्हवीला आता संपूर्ण आठवडाभर ही शिक्षा भोगावी लागणार आहे. निक्कीला सुद्धा रितेशने “घरात चांगलं वागा नाहीतर, जेलमध्ये पुढचा नंबर तुमचा असेल” असं थेट सांगितलं आहे. याशिवाय अरबाजला सुद्धा भाऊच्या धक्क्यावर ताकीद देण्यात आली. त्यामुळे यंदाचा भाऊचा धक्का नेहमीपेक्षा काहीसा वेगळा ठरला. दुसऱ्या दिवशी ( रविवार ) कार्यक्रमात ‘दुर्गा’ मालिकेची टीम आली होती. यापैकी दुर्गाने घरातील सदस्यांना प्रश्न विचारले आणि पुरुष सदस्यांसह रॅपिड फायर राऊंड खेळण्यात आला. तसेच आज भाऊच्या धक्क्यावर श्रेयस तळपदे व कंगना रणौत देखील आल्या होत्या. पुढे, रितेशने रविवारी चक्रव्यूह खोलीत निक्की आणि आर्याला पाठवलं होतं. निक्की तिच्याबद्दलच्या चुगल्या ऐकून भयंकर संतापली होती. “यापुढे मी ‘ग्रुप A’चा भाग नसेन” असं तिने सर्वांसमोर स्पष्ट केलं आहे. हेही वाचा : Video : “ग्रुप A ला ट्रॉफी उचलू देणार नाही…”, चुगली ऐकताच निक्की भडकली! पण, नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया सगळे टास्क संपल्यावर अखेर एलिमिनेशनची वेळ झाली. सर्वात जास्त मतं मिळवून या आठवड्यात आर्या सेफ झाली आहे. यानंतर बॉटम ३ मध्ये अभिजीत, वैभव आणि इरिना होते. यापैकी अभिजीतला रितेशने आर्यानंतर सेफ केलं आणि वैभव-इरिनापैकी घराचा निरोप कोण घेणार? याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलं. त्यानंतर या आठवड्यात इरिना एलिमिनेट झाल्याचं रितेशने जाहीर केलं. भावुक होत इरिनाने या घराचा निरोप घेतला. इरिना जाताना सर्वांना निरोप देत म्हणाली, “तुमच्यासाठी काहीपण…! मी हा खेळ खेळण्यासाठी माझे १०० टक्के दिले. जर मी कोणाला दुखावलं असेल तर, प्लीज मला माफ करा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा! नेहमी तुम्ही सगळे आहात तसेच वागा. सगळ्यांना ट्रॉफी हवीये… सगळ्यांना गेम खेळायचाय पण, तुम्ही जसे आहात तसेच राहा.” हेही वाचा : Bigg Boss Marathi : “रितेशला ठरवून कुणाचा अपमान करता येत नाही”, लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट; म्हणाली, “त्याच्या डोळ्यात…” दरम्यान, इरिनाने आपल्या म्युच्युअल फंडचा वारसदार वैभवला करत त्याच्या खात्यात ५० पॉईंट्स जमा केले आहेत. आता पाचव्या आठवड्यात घरातली ( Bigg Boss Marathi ) समीकरणं कशी बदलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.