MANORANJAN

“तुम्ही समानता आणि न्यायाचे दीपस्तंभ बनून…”, देवेंद्र फडणवीसांसाठी अमृता फडणवीसांची खास पोस्ट

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते व राजकीय क्षेत्रातील मंडळी त्यांना शुभेच्छा देत आहेत. देवेंद्र फडणवीसांसाठी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी खास पोस्ट केली आहे. एक सुंदर फोटो शेअर करत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. “देवेंद्र फडणवीस तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुम्ही समानता आणि न्यायाचे दीपस्तंभ बनून, लोकांच्या जीवनात सुधारणा करावी आणि जगाला आनंदाने उजळून टाकावे, अशा शुभेच्छा.” A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis) Like Mother like Daughter! अमृता फडणवीस अन् लेक दिविजाचा Same to Same लूक, पाहा ग्लॅमरस फोटो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज ५४ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. अमृता फडणवीस यांनी केलेल्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ‘साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,’ ‘देवेंद्रजी वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा,’ ‘माननीय उपमुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा’ अशा कमेंट्स या पोस्टवर केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Political Career) यांनी आपली राजकीय कारकीर्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून सुरू केली आणि १९९० च्या दशकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमध्ये सामील झाले. त्यांनी नागपूरच्या राम नगर प्रभागातून त्यांची पहिली महापालिका निवडणूक जिंकली आणि १९९२ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९७ मध्ये, ते नागपूर महानगरपालिकेचे सर्वात तरुण महापौर आणि भारतातील दुसरे सर्वात तरुण महापौर बनले. १९९९ पासून ते २००४ पर्यंत सलग तीन वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. आता सरकारी कर्मचाऱ्यांना RSS मध्ये जाण्यावर बंदी नाही, केंद्र सरकारनं ५८ वर्षांपूर्वी घातलेली बंदी उठवली २०१९ साली त्यांनी भाजपाचे १०५ आमदार निवडून आणले. पण शिवसेनेने निकालानंतर युती तोडल्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबर त्यांनी अचानक मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण बहुमत सिद्ध न करू शकल्याने त्यांनी तीन दिवसात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मग २०२२ साली शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांना सोबत घेत बंडखोरी केली व त्यांनी देवेंद्र फडणवीसांबरोबर राज्यात सरकार स्थापन केलं. त्यानंतर २०२३ मध्ये राष्ट्रवादीतून अजित पवार वेगळे झाले व तेही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.