MUMBAI

महापालिकेच्या भूमिकेचा निषेध! १६ डिसेंबरच्या आंदोलनात सहभागी होण्याचे मुंबईकरांना आवाहन

लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई : बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास पालिका प्रशासनाने नकार दर्शवल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पालिकेच्या भूमिकेच्या निषेधार्थ बेस्ट कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली २६ डिसेंबर रोजी बेस्ट कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनीही काळ्या फिती लावून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन कामगार सेनेने केले आहे. बेस्ट उपक्रमातील परिवहन विभागाची वाढत चाललेली तूट, कमी होत चाललेला बसताफा, तसेच वाढत्या अपघातांच्या घटना यामुळे बेस्टची दुर्दशा झाली असून त्यावर तोडगा काढावा या मागणीसाठी बेस्ट कामगार सेनेने गेल्या आठवड्यात मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली होती. बेस्टचे खासगीकरण थांबवावे, बेस्टमधील भाडेतत्त्वावरील बसगाड्यांची सेवा तत्काळ बंद करावी व बेस्टचा स्वमालकीचा ताफा वाढवावा आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी यावेळी केल्या. मात्र पालिका आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांना कोणतेही आश्वासन दिले नाही. त्यामुळे बेस्ट कामगार सेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र पाठवले होते. मात्र यावर काहीही तोडगा न निघाल्यामुळे २६ जानेवारी रोजी काळ्या फिती लावून काम करण्याचे आवाहन कामगार सेनेने केले आहे. कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सोमवारी याबाबतची माहिती दिली. आणखी वाचा- तळोजा येथील गृहप्रकल्पातील १७०० सदनिका खरेदीदारांच्या फसवणुकीचा आरोप, विकासक ललित टेकचंदानी यांची अटक बेकायदा कुर्ला येथे बेस्ट बसच्या भीषण अपघातामुळे बेस्टच्या परिवहन विभागातील ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. बेस्टचे खासगीकरण झाल्यामुळे बेस्टमध्ये मोठ्या प्रमाणात जीवघेणे अपघात झाले आहेत. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे बेस्टमध्ये इलेक्ट्रिक गाड्या घ्याव्या लागत आहेत. बेस्टमधील पूर्वीच्या अशोक लेलॅण्ड कंपनीच्या गाड्या चांगल्या दर्जाच्या होत्या. मात्र इलेक्ट्रिक गाड्यांना आग लागण्याच्या घटना घडत आहेत. तसेच बेस्टचा अभियांत्रिकी विभाग बसची देखभाल करण्यास सक्षम आहे. मात्र खासगीकरणामुळे हा विभाग बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे मत सुहास सामंत यांनी व्यक्त केले आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.